शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

जिल्ह्यातील ४६ मतदान केंद्रात बदल

By admin | Updated: October 13, 2014 23:20 IST

जिल्ह्यातील आरमोरी, गडचिरोली आणि अहेरी मतदार संघातील एकूण ४६ मतदान केंद्र बदलाचा प्रस्ताव भारत निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला मान्यता प्राप्त झाली

गडचिरोली : जिल्ह्यातील आरमोरी, गडचिरोली आणि अहेरी मतदार संघातील एकूण ४६ मतदान केंद्र बदलाचा प्रस्ताव भारत निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला मान्यता प्राप्त झाली असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी रणजीत कुमार यांनी सांगितले.जिल्हाधिकारी रणजीत कुमार म्हणाले, जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे राज्याचे प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यामार्फत भारत निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. हा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. आरमोरी विधानसभा मतदारसंघातील सात, गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील सहा आणि अहेरी विधानसभा मतदार संघातील सर्वाधिक ३३ मतदान केंद्रात फेरबदल करण्यात आले असून एकूण ४६ मतदान केंद्रात बदल करण्यात आले आहेत.विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्र्र, कंसात फेरबदलानंतरचे मतदान केंद्र. ६७ आरमोरी विधानसभा मतदार संघ - ३९ लेकूरबोडी (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नवेझरी), १३६ नडेकाल/ बेतकाठी (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डोलडोंगरी), २५४ दराची (जिल्हा परिषद उच्च श्रेणी शाळा, सुरसुंडी), २५५ चारवाही (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्रमांक १, तुमडीकसा), २५६-चारवाही- गुरेकसा (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्रमांक २, तुमडीकसा), २५७ - कटेझरी (ग्रामपंचायत कार्यालय, देवसूर), २६०- कुलभट्टी (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चरवीदंड).६८ गडचिरोली विधानसभा मतदार संघ - ४८ दराची (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्र.२, मालंदा), १४८ मुंगनेर (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,चव्हेला), १५० कामथळा (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,कामनगड), १६० जप्पी (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मुरगाव), १६१ पुसटोला ( ग्रामपंचायत कार्यालय, फुलबोडी), २४८ ढेकणी (जिल्हा परिषद उच्चश्रेणी प्राथमिक शाळा, इमारत क्रमांक २, ६९ - अहेरी विधानसभा मतदार संघ -१० वेगनूर (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्रमांक २, रेगडी), १५ दोलंदा (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्रमांक २, जारावंडी), १९ भापडा (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्रमांक ३, जारावंडी), २० सोहगाव (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्रमांक ४, जारावंडी), २१ गुंडम (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्रमांक ३, घोटसूर), २३ गडदापल्ली (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्रमांक २, कोटमी), ७६ मानेवारा (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्रमांक २, घोटसूर), ७७ मेढरी (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्रमांक २, सेवारी स.), ७८ जव्हेली खुर्द (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्रमांक ३, ७९ कचलेर (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्रमांक ३, हालेवारा), ८० बुर्गी- म. पिपली (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्रमांक ४, हालेवारा), ८१ कुद्री (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्रमांक ५, हालेवारा), ११३ पुसकोटी (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्रमांक २, गर्देवाडा), ११४ वांगेतुरी (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गर्देवाडा), ११९ विसामुंडी (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्रमांक २, ताडगाव), १२३ गुर्जा - बुज (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मेडपल्ली), १७३ पोयरकोटी (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्रमांक २, कोटी), १७४ होडरी (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्रमांक २, लाहेरी), १७५ बिनागुंडा (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्रमांक ३, लाहेरी), १७९ नेलगुंडा (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्रमांक २, दोडराज), १८० गोंगवाडा (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्रमांक ३, धोडराज), १८१ भटपार (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्रमांक ४, धोडराज), १८२ गोलागुडा (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्रमांक ५, धोडराज), १८६ पल्ली (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्रमांक २, ताडगाव), १९२ येचली (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्रमांक ३, मन्नेराजाराम), १९३ ब्राम्हणपल्ली (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्रमांक ३, मन्नेराजाराम), १९४ कुरूमपल्ली (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्रमांक २, पल्ले), १९५ कोडसेपल्ली (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्रमांक २, येरमनार), २०५ आशा (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्रमांक २, कमलापूर), २१६ रेगुलवाही (जिल्हा परिषद उच्च श्रेणी प्राथमिक शाळा, इमारत क्रमांक २, मरपल्ली), २३० कल्लेड स. (अंगणवाडी केंद्र, मेटीगुडम), २६४ अहमदअली (अंगणवाडी केंद्र, चिटूर), २६७ पातागुडम (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्र. २, कोर्लामाल). अशाप्रकारे मतदान केंद्रात फेरबदल करण्यात आले आहेत, याची संबंधीत गावातील मतदारांनी नोंद घेऊन निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)