शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

४२ कर्मचारी आंदोलनावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 00:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्य एड्स नियंत्रण सोसायटी अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाºयांच्या वेतनातील फरकाची रक्कम देण्यास शासन टाळाटाळ करीत आहे. या विरोधात महाराष्टÑ राज्य एड्स नियंत्रण महाराष्ट्र सोसायटी वडाळा मुंबई अंतर्गत येणाºया सर्व कर्मचाऱ्यांचे १ जानेवारी २०१८ पासून असहकार आंदोलन सुरू झाले आहे. गडचिरोली जिल्हा मुख्यालयासह रूग्णालय असलेल्या तालुक्याच्या ठिकाणी ...

ठळक मुद्देएड्स नियंत्रण कार्यक्रमातील कर्मचारी : वेतनातील फरकाची रक्कम मिळण्यासाठी असहकार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्य एड्स नियंत्रण सोसायटी अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाºयांच्या वेतनातील फरकाची रक्कम देण्यास शासन टाळाटाळ करीत आहे. या विरोधात महाराष्टÑ राज्य एड्स नियंत्रण महाराष्ट्र सोसायटी वडाळा मुंबई अंतर्गत येणाºया सर्व कर्मचाऱ्यांचे १ जानेवारी २०१८ पासून असहकार आंदोलन सुरू झाले आहे. गडचिरोली जिल्हा मुख्यालयासह रूग्णालय असलेल्या तालुक्याच्या ठिकाणी गुरूवारपासून एड्स नियंत्रण सोसायटीच्या कर्मचाºयांनी असहकार आंदोलन सुरू केले आहे.संपूर्ण महाराष्ट्रातून एड्स नियंत्रण कार्यक्रमातील एकूण २ हजार ३०४ कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत, अशी माहिती एड्स नियंत्रण कर्मचारी संघटनेचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रमोद म्हशाखेत्री यांनी लोकमतला दिली आहे.एड्स नियंत्रण सोसायटी अंतर्गत सर्व कर्मचारी आधीच तुटपुंज्या मानधनावर काम करीत आहेत. असे असताना राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेकडे कर्मचाºयांच्या प्रलंबित समस्यांबाबत पाठपुरावा करण्यात आला. कर्मचाºयांना वेतनवाढीच्या फरकाची रक्कम, जिल्हा अंतर्गत, जिल्हाबाह्य बदली, सन २०१६-१७ व २०१७-१८ ची वाढ आणि फरकाची रक्कम अद्यापही या कर्मचाºयांना देण्यात आली नाही. संघटनेने या संदर्भातील माहिती वारंवार सोसायटीला दिली. परंतु सोसायटीने या बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी असहकार आंदोलन सुरू केले आहे.एड्स नियंत्रण सोसायटीतील गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयाशी संलग्नित असलेले सर्व कर्मचारी जिल्हा रूग्णालयाच्या परिसरात बसून असहकार आंदोलन करीत आहेत. या आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद म्हशाखेत्री, जिल्हा सचिव शेषराव खोब्रागडे यांच्यासह अनेक कर्मचारी सहभागी झाले आहेत. याशिवाय अहेरी, धानोरा, कुरखेडा, आरमोरी, चामोर्शी व इतर रूग्णालयाच्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे.मासिक, आठवडी अहवाल थांबणारसदर असहकार आंदोलनादरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील आयसीटीसी, एआरटी सेंटर, एसटीडी, ब्लड बँक, व डापकू या सर्व विभागाच्या कामाचा कुठलाच मासिक, आठवडी, दैनंदिन अहवाल राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई यांना पाठविण्यात येणार नसल्याचा निर्णय कर्मचारी संघटनेच्या वतीने घेण्यात आला आहे.जिल्ह्यातील एड्स नियंत्रण सोसायटीचे सर्व कर्मचारी या असहकार आंदोलनात सहभागी झाले असले तरी या असहकार आंदोलनामुळे कुठल्याही रूग्णसेवेवर अथवा कर्मचाऱ्यांच्या कामावर कुठल्याच प्रकारचा परिणाम होणार नसल्याची काळजी कर्मचारी संघटनेच्या वतीने घेण्यात आली आहे, अशी माहिती अध्यक्ष म्हशाखेत्री यांनी दिली आहे.