शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
3
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
4
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
5
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
6
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
7
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
8
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
9
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
10
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
11
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
12
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
13
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
14
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
15
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
16
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
17
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
18
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
19
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
20
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार

४१ कोरोनामुक्त तर ७८ नवीन बाधितांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 05:00 IST

दिवाळीच्या पूर्वीपासून थंडी सुरू झाल्याने अनेकांना सर्दी, पडसे व खाेकल्याचा त्रास हाेऊ लागला, अचानक वातावरणात बदल झाल्याने काही नागरिकांचे तापमान वाढू लागले. मात्र काेराेना चाचणी करण्यासाठी काही नागरिक पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे. दरवर्षीच्या हिवाळ्यात सर्दी, खाेकला, अंगदुखी आदी त्रास हाेत असल्याचा अनुभव पाहून नागरिक खासगी डाॅक्टरांकडे जाऊन औषधाेपचार घेत आहेत.

ठळक मुद्देआतापर्यंत ६५१० जणांनी केली कोरोनावर मात, केवळ ४६६ रुग्ण बाकी

  लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात बुधवारी ७८ नवीन कोरोनाबाधित आढळून आले, तर ४१ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली. यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंत बाधित ७०४९ पैकी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ६५१० वर पोहचली आहे. सध्या ४६६ क्रियाशिल कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ७३ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्ह्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.३५ टक्के, क्रियाशिल रूग्णांचे प्रमाण ६.६१ टक्के तर मृत्यूदर १.०४ टक्के झाला आहे. नवीन ७८ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ४२, अहेरी २०, भामरागड ४, चामोर्शी ५, एटापल्ली ४, मुलचेरा १, सिरोंचा १ आणि देसाईगंज येथील एका जणाचा समावेश आहे. कोरोनामुक्त झालेल्या ४१ रूग्णांमध्ये गडचिरोली २६, अहेरी १, आरमोरी ५, चामोर्शी ४, एटापल्ली १, कुरखेडा २ आणि देसाईगंजमधील २ जणांचा समावेश आहे.

काेराेना चाचणी करणाऱ्यांची संख्या घसरलीदिवाळीच्या पूर्वीपासून थंडी सुरू झाल्याने अनेकांना सर्दी, पडसे व खाेकल्याचा त्रास हाेऊ लागला, अचानक वातावरणात बदल झाल्याने काही नागरिकांचे तापमान वाढू लागले. मात्र काेराेना चाचणी करण्यासाठी काही नागरिक पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे. दरवर्षीच्या हिवाळ्यात सर्दी, खाेकला, अंगदुखी आदी त्रास हाेत असल्याचा अनुभव पाहून नागरिक खासगी डाॅक्टरांकडे जाऊन औषधाेपचार घेत आहेत. गेल्या १५ ते २० दिवसांपासून काेराेनाची ॲन्टीजन व आरटीपीसीआर चाचणी करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. परिणामी बाधित नागरिकांचीही संख्या कमी झाल्याचे दिसून येत आहे. 

गडचिराेली शहरासह तालुक्यात ४२ पाॅझिटिव्ह रूग्ण आढळले

नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील सोनापूर कॉम्प्लेक्स १, गणेश मंदिर गोकुल नगर  ४, टिचर्स कॉलनी अयोध्या नगर १, रामनगर  २,  बालाजी नगर चामोर्शी रोड १, पोटेगाव  २, सर्वोदय वार्ड २, वाकडी १, लांझेडा वार्ड  ४, शाहु नगर ३, रेड्डी गोडाऊन ४, स्नेह नगर  ४, विवेकानंद नगर १, आझाद चौक १, स्थानिक १, अडपल्ली गोगाव १,  डोंगरे पेट्रोल पंप १, इंदाळा पारडी २, पोलीस संकुल १, राखी गुलवाडा १, अहेरी तालुक्यातील बाधितांमध्ये बोरी १,आलापल्ली १४, प्राणहिता ३, पेरमिली १,  स्थानिक १, तसेच भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक २, पीएचसी मन्नेराजाराम १, पोलीस स्टेशन १, चामोर्शी तालुक्यातील बाधितांमध्ये अनखोडा २, आष्टी १, स्थानिक १, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक १, सीआरपीएफ १, बंगाली कॅम्प  १, बसस्टॉप जवळ १, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये शहीद बाबुराव हायस्कुलजवळील १, सिरोंचा तालुक्यातील नारायणपूरचा १ तसेच देसाईगंज तालुक्यातील हनुमान वार्डमधील १ आदी रुग्णांचा समावेश आहे. याशिवाय चंद्रपूर जिल्ह्यातील ५ जणांचाही यात समावेश आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात काेराेना संसर्गाची भीती अधिक निर्माण झाली आहे.  ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात काेराेना पाॅझिटीव्ह रूग्णांची संख्या दिवाळीच्या सुट्यांमध्ये वाढली आहे. बरेच लाेक काेराेनासंदर्भात बिनधास्त हाेऊन गावाेगावी प्रवास केले. यातून अनेकांना बाधा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या