लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : सांज माडिया बिनागुंडा स्थित भामरागडात या संस्थेद्वारे ग्रामीण रूग्णालय भामरागड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरादरम्यान सुमारे ४१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.रक्त संकलन करण्याकरिता उपजिल्हा रूग्णालय अहेरी येथील तंत्रज्ञ सरिता वाघ, शिरीन कुरैशी, गोपाल महतो, वैैद्यकीय अधीक्षक डॉ. चौधरी, विनोद गजभित, रत्नदीप दुधे आदी उपस्थित होते.युवकांसोबतच विशाखा मंडल, पूजा बाला, श्यामला उईके या महिलांनीसुद्धा रक्तदान करून युवकांना प्रोत्साहित केले. भामरागड तालुक्यात सिकलसेल रूग्णांची संख्या १८० च्या वर आहे. या रूग्णांना नेहमी रक्ताची गरज भासते. रक्ताअभावी अनेक रूग्ण दगावल्याच्याही घटना घडल्या आहेत. रक्ताची ही गरज पूर्ण करण्याच्या उद्देशाने सांज माडिया संस्थेतून मागील अनेक वर्षांपासून अधून-मधून रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते.दुर्गम भागातील युवकांमध्ये अजुनही रक्तदानाविषयी चुकीची समजूत आहे. त्यामुळे ते रक्तदान करण्यास सहजासहजी तयार होत नाही. सांज माडिया संस्थेचे अध्यक्ष रूपेशकुमार गोंगले यांनी युवकांना रक्तदान करण्याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर युवक तयार झाले. त्यामुळेच सुमारे ४१ युवकांनी रक्तदान केले. सांज माडिया संस्थेच्या या सामाजिक उपक्रमाचे भामरागडवासीयांनी कौतुक केले आहे. यशस्वीतेसाठी युवकांनी सहकार्य केले.रक्तपेढीची गरजभामरागड हे तालुकास्थळ अहेरीपासून सुमारे १०० किमी अंतरावर आहे. त्यामुळे भामरागड येथे रक्तपेढीची नितांत आवश्यकता आहे. सांज माडिया संस्था व इतर लोकप्रतिनिधी ंकडून याठिकाणी रक्तपेढी निर्माण करण्याची मागणी होत आहे. मात्र शासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.
भामरागडात ४१ जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 01:12 IST
सांज माडिया बिनागुंडा स्थित भामरागडात या संस्थेद्वारे ग्रामीण रूग्णालय भामरागड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरादरम्यान सुमारे ४१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
भामरागडात ४१ जणांचे रक्तदान
ठळक मुद्देरूग्णांसाठी संजीवनी : सांज माडिया संस्थेचा उपक्रम