शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

आचारसंहितेचे ३९ गुन्हे

By admin | Updated: October 13, 2014 23:21 IST

विधानसभेच्या निवडणूक जाहीर झाल्यानंतर आतापर्यंत जिल्ह्यात आचारसंहिता उल्लंघनाचे ३९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय निवडणुकीसंबंधी इतर ९ गुन्हेही दाखल झाल्याची माहिती

सर्वाधिक गुन्हे गोंदियात : आठ लाखांची दारू जप्तगोंदिया : विधानसभेच्या निवडणूक जाहीर झाल्यानंतर आतापर्यंत जिल्ह्यात आचारसंहिता उल्लंघनाचे ३९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय निवडणुकीसंबंधी इतर ९ गुन्हेही दाखल झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.अमित सैनी यांनी दिली.निवडणूक तयारीसंबंधी जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी सायंकाळी पत्रपरिषदेत सविस्तर माहिती दिली. यावेळी पोलीस अधीक्षक शशीकुमार मिना, उपजिल्हा निवडणूक अधिकारी लोणकर, उत्पादन शुल्क अधीक्षक धार्मिक, जिल्हा कोषागार अधिकारी नेमाडे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे प्रामुख्याने उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीच्या काळात अवैध मद्याच्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघात विविध ठिकाणी धाडसत्र राबविले. विधानसभेची आचारसंहिता लागू झाल्यापासून विभागाने एकूण ११० ठिकाणी धाडी घातल्या असून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत १०५ गुन्हे नोंदवून ६७ आरोपींना अटक केली आहे. विभागाने आतापर्यंत १९१ लीटर देशी दारू, ४१ लीटर विदेशी दारू, ११४८ लीटर मोह दारू, २९ हजार ५०० लीटर मोहा सडवा, ६० किलो गूळ, १८० किलो मोहफुले व इतर साहीत्य असा एकूण सात लाख ९१ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जिल्ह्यातील ठोक विदेशी व देशी मद्य विक्रेत्यांकडून किरकोळ मद्य परवानाधारकांना होणाऱ्या मद्याच्या वितरणावर राज्य उत्पादन शुल्क विभाग सर्व परवानाधारकांकडून मद्याची सुरूवातीची शिल्लक, आवक, विक्री व अखेरच्या शिल्लकेची माहिती दररोज मागविण्यात येत आहे. तसेच मद्य दुकानांच्या कामकाजाच्या वेळाही काटेकोरपणे पाळल्या जात असल्याची तपासणी केली जात आहे. गोंदिया जिल्ह्याची सीमा बालाघाट (मध्य प्रदेश) व राजनांदगाव (छत्तीसगढ) या जिल्ह्यांशी जोडली गेली असल्याने परराज्यातून अवैधरित्या मद्याची आवक होऊ नये याकरिता स्थायी सीमा तपासणी नाका कार्यरत असून सतोना (ता.गोदिया), घाटटेमनी (ता.आमगाव), बोंडराणी (ता.तिरोडा)व वाघ नदीच्या पुलाजवळ (ता.आमगाव) टेहळणी पथके कार्यरत आहेत. विधानसभा निवडणूक खुल्या व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १३ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजतापासून १४ आॅक्टोबर रोजी पूर्ण दिवस व १५ आॅक्टोबर रोजी म्हणजेच मतदानाचा संपूर्ण दिवस जिल्ह्यातील सर्व देशी, विदेशी, बिअर इत्यादी सर्व परवानाधारक दुकाने बंद ठेवली जाणार आहे. या कालावधीत विभागाने विशेष पथके तयार केली आहे. या पथकांकडून अवैधरित्या मद्य निर्मिती विक्री वाहतूक व वितरण इत्याही गैरप्रकारांवर प्रभावीपणे दिवस रात्र गस्त घालून कारवाई केली जात आहे.