शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

जिल्हाभरात 34 माध्यमिक शिक्षक आढळले काेराेनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 05:00 IST

२३ नाेव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. काेराेनाचे संकट कायम असतानाही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेऊ नये, यासाठी शासनाने वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा सुरू करताना विद्यार्थी काेराेनाबाधित हाेणार नाही, यासाठी पूर्ण खबरदारी शासनामार्फत घेतली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिक्षकांची काेराेना तपासणी केली जात आहे. शिक्षण विभागाकडे उपलब्ध माहितीनुसार नववी ते बारावीपर्यंतच्या वर्गांना शिकविणारे एकूण २ हजार ७५६ शिक्षक आहेत.

ठळक मुद्देशाळा सुरू करण्याची पूर्वतयारी : २,७५६ शिक्षकांची हाेणार तपासणी

  लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : नववी ते बारावीपर्यंतच्या वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षकांची काेराेना तपासणी केली जात आहे. शनिवारपर्यंत ९०२ शिक्षकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३४ शिक्षक काेराेनाबाधित आढळून आले आहेत. २३ नाेव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. काेराेनाचे संकट कायम असतानाही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेऊ नये, यासाठी शासनाने वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा सुरू करताना विद्यार्थी काेराेनाबाधित हाेणार नाही, यासाठी पूर्ण खबरदारी शासनामार्फत घेतली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिक्षकांची काेराेना तपासणी केली जात आहे. शिक्षण विभागाकडे उपलब्ध माहितीनुसार नववी ते बारावीपर्यंतच्या वर्गांना शिकविणारे एकूण २ हजार ७५६ शिक्षक आहेत. यात जिल्हा परिषद, आश्रमशाळा, खासगी व्यवस्थापनाच्या शाळा, इंग्रजी माध्यमाच्या शाळा या शाळांमधील शिक्षकांचा समावेश आहे. गुरूवारपासून शिक्षकांची काेराेना तपासणीस सुरूवात झाली. शनिवारपर्यंत जवळपास ९०० शिक्षकांची काेराेना तपासणी पूर्ण झाली आहे. यामध्ये ३४ शिक्षक काेराेनाबाधित आढळून आले आहेत. या शिक्षकांना आता वर्गावर अध्यापनासाठी न पाठविता दवाखान्यात पाठविले जाणार आहे. विद्यार्थ्यांना संसर्ग हाेऊ नये, यासाठी आवश्यक ती खबरदारी शानामार्फत घेतली जात आहे. साेमवारपर्यंत  शिक्षकांची तपासणी पूर्ण  हाेईल. अर्ध्यापेक्षा अधिक शिक्षकांची तपासणी शिल्लक आहे. त्यामुळे काेराेनाबाधित शिक्षकांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 

११९ बाधितांची शनिवारी पडली भरशनिवारी ११९ नवीन काेराेनाबाधितांची भर पडली आहे. ३८ जणांनी काेराेनावर मात केली आहे. नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील सीआरपीएफ १, आयटीआय चौक १, कॅम्प एरिया २, टेंभा २, अयाेध्यानगर १, तिरुपती कॉम्पलेक्स २, गोकुलनगर ८, लांजेडा १, आयटीआय बायपास मथुरानगर १, माैशिखांब १, गांधीवाॅर्ड १, स्नेहनगर १, पंचवटीनगर १, रामनगर २, गोगाव १, पोटेगाव १, राजगाटाचेक १, लालबहादुर विद्यालय जवळ डोंगरगाव १, राधे बिल्डींग जवळ २, इतर स्थानिक १६, इंदिरानगर १, मुरखळा १, येवली १, डीआयजी कार्यालय १, कारमेल स्कुलच्या मागे १, शिवाजी कॉलेजच्या मागे १, अयोध्यानगर १, कस्तुरबा वाॅर्ड १, बर्डी १, फुड लव्हर रेस्टॉरेंट धानोरा रोड १, कन्नमवार नगरातील एका काेराेनाबाधित रूग्णाचा समावेश आहे.

अहेरी तालुक्यातील बाधितांमध्ये आलापल्ली २, स्थानिक ३, नागेपल्ली २, आलापल्ली टिचर कॉलनी गोंड मोहल्ला १, आरमोरी तालुक्यातील स्थानिक‍ १, भामरागड तालुक्यातील  मन्नेराजाराम पीएचसी १, चामोर्शी तालुक्यातील स्थानिक ३, लखमापुर १, एमजेएफ स्कुल आष्टी १, आष्टी २, सोनापुर १, येनापुर १, धानोरा तालुक्यातील रांगी १, सोडे २, स्थानिक १, एटापल्ली तालुक्यातील उडेरा ३, डुम्मे १, घोटसुर २, कोरची तालुक्यातील स्थानिक १, कुरखेडा तालुक्यातील अंगारा ७, अरततोंडी २, गेवर्धा २, खामटोला १, घाटी १, उराडी १, मुलचेरा तालुक्यातील सुभाषग्राम १, विवेकानंदपुर १, सिरोंचा तालुक्यातील स्थानिक २, टेकाडा १, झेडपी शाळा १, तसेच देसाईगंज तालुक्यातील कोकडी २, तुकुम वाॅर्ड २, आमगाव १, गांधीवाॅर्ड २, बीएव्ही २, पीजीएच १, कोंढाळा १ असा समावेश आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या