शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मांसाहार खालेल्लं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
2
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
3
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
4
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
5
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
6
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
7
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
8
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
9
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
10
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
11
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
12
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
13
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
14
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
15
काळजी घ्या! मार्केटमध्ये नवीन स्कॅम आला, व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका पाठवून बँक खाते रिकामे करतात
16
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
17
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न
19
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
20
IB Recruitment: गुप्तचर विभागात ज्युनियर ऑफिसर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता

३४ टक्केच कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 23:58 IST

जिल्हाभरातील बँकांना दिलेल्या उद्दिष्टाच्या केवळ ३४ टक्केच कर्ज वाटप झाले आहे. बँकांना खरीप हंगामात १९४ कोटी ६२ लाख रूपयांच्या कर्जाचे वितरण करण्याचे उद्दिष्ट दिले होते.

ठळक मुद्देखरिपातील पीक कर्जाची स्थिती : धान रोवणीचे काम संपले, कर्जाची मागणी मंदावली

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हाभरातील बँकांना दिलेल्या उद्दिष्टाच्या केवळ ३४ टक्केच कर्ज वाटप झाले आहे. बँकांना खरीप हंगामात १९४ कोटी ६२ लाख रूपयांच्या कर्जाचे वितरण करण्याचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी १८ हजार ८८४ शेतकºयांना ७५ कोटी ६९ लाख रूपयांच्या कर्जाचे वितरण झाले आहे.कर्जासाठी शेतकरी सावकाराच्या दारात उभा होऊ नये, यासाठी राष्टÑीयकृत बँकांना शेतकºयांना पीक कर्जाचे वितरण करणे बंधनकारक केले आहे. दरवर्षी खरीप हंगामाच्या पूर्वी संबंधित बँकांना कर्ज वितरणाचे उद्दिष्ट दिले जाते. किमान उद्दिष्टाएवढे किंवा त्यापेक्षा अधिक प्रमाणात कर्ज वितरण करणे अपेक्षित असले तरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वगळता राष्टÑीयकृत बँका कर्जाचे वितरण करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येते. त्यामुळे बँकांना दिलेले उद्दिष्ट कधीच पूर्ण होत नाही. काही बँकातर एकाही शेतकºयाला कर्ज देत नसल्याची परिस्थिती आहे. अशा बँकांवर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी होत असली तरी कोणतीही कारवाई होत नसल्याने बँकेचे प्रशासन सरकारलाही जुमानत नसल्याचे दिसून येते.गडचिरोली जिल्ह्यात सुमारे दीड लाख हेक्टरवर धान पिकाचे खरीपात उत्पादन घेतले जाते. धान हे येथील प्रमुख व महत्त्वाचे पीक आहे. या पºहे टाकण्यापासून तर धानाची रोवणी, निंदन, कापणी, मळणी, यासाठी मोठ्या प्रमाणात पैशाची गरज भासते. त्यामुळे शेतकरी वर्गाला कर्ज काढल्याशिवाय पर्याय राहत नाही. बँकांकडून घेतलेले कर्ज बिनव्याजी राहत असल्याने ते कर्ज शेतकºयांना परवडणारेही आहे. या कर्जावरील व्याज शासन बँकांना उपलब्ध करून दिली. त्यामुळे कृषी कर्जांमध्ये बँकांचा कोणताही तोटा नाही. मात्र बँकेचे प्रशासन शेतकºयांना कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याने कर्ज वितरणाचे उद्दिष्ट कोणत्याच वर्षी गाठता येत नसल्याचे दिसून येते. बँकांना वेळोवेळी निर्देश दिल्यानंतरही बँका कर्ज वितरणास तयार होत नाही. ही अतिशय गंभीर बाब असल्याने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.कर्जमाफीचा परिणामकर्जमाफी होणार आहे याचा अंदाज शेतकºयांना जवळपास मार्च महिन्यापासून येण्यास सुरूवात झाली. त्यामुळे बहुतांश शेतकºयांनी कर्जच भरले नाही. दरवर्षी नियमितपणे कर्ज भरणाºया शेतकºयांनी कर्जमाफीच्या अंदाजामुळे मागील वर्षीच्या पीक कर्जाची परतफेड केली नाही. परिणामी त्यांना नवीन कर्ज उचलता आले नाही. ३१ जुलैपर्यंत मागील वर्षी सुमारे २२ हजार ९६७ शेतकºयांना कर्जाचे वितरण केले होते. तर यावर्षी केवळ १६ हजार ९०३ शेतकºयांना कर्ज वितरण झाले आहे. दरवर्षी जिल्हा मध्यवर्ती बँकेला दिलेल्या उद्दिष्टाच्या अधिक कर्ज वितरण सदर बँक करते. यावर्षी मात्र १५ आॅगस्टपर्यंत केवळ ७१ टक्केच कर्ज वितरण झाले आहे. धानाच्या शेतीत सर्वाधिक खर्च रोवणीसाठी येतो. त्यामुळे बहुतांश शेतकरी रोवण्याच्या पूर्वीच कर्जाचे उचल करतात. आता रोवणीची कामे संपली आहेत. त्यामुळे कर्जाची उचल होण्याची फार कमी शक्यता आहे.रोवणीची कामे आटोपलीरोवणीच्या कामासाठी सर्वाधिक खर्च येत असल्याने शेतकरी रोवणीपूर्वीच कर्ज घेतो. रोवणीची कामे आता आटोपली आहे. त्यामुळे कर्जाची मागणी मंदावणार आहे.