शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
2
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
3
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
4
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
5
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
6
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
7
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
8
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
9
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
10
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
11
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
12
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
13
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
14
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
15
Video - मेलेलं झुरळ, वर कीटकांची पावडर... कॉकरोच कॉफी तुफान व्हायरल, जाणून घ्या किंमत
16
जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं ट्रॅविस हेडची ‘तोडफोड’ सेंच्युरी! असा पराक्रम करणारा ठरला जगतातील पहिला फलंदाज
17
टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल
18
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?
19
सामुद्रिक शास्त्र: शरीराच्या कुठल्या भागावर 'तिळ' आहे, त्यानुसार समुद्र शास्त्र सांगते तुमचे भाकीत!
20
​​​​​​​Kotak Mahindra Bank Success Story: २ खोल्यांपासून झाली सुरुवात, आज ४ लाख कोटींचा टर्नओव्हर; वाचा कोटक महिंद्रा बँकेची अनटोल्ड स्टोरी
Daily Top 2Weekly Top 5

दाेन महिन्यात ३३ हजार मनुष्यदिन राेजगार निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 05:00 IST

आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या अनेक शेतमजूर कुटुंबांना रोहयोमुळे दिलासा मिळाला आहे. आरमोरी तालुक्यात प्रशासनाने जारी केलेल्या   लाॅकडाऊनच्या नियमांचे पालन करून मास्कचा वापर, सॅनिटायझर, तापमान व ऑक्सिमीटर तपासणी इत्यादी सोयी-सुविधा कामाच्या ठिकाणी  उपलब्ध करून देऊन व योग्य ती खबरदारी घेऊन आरमोरी तालुक्यात ग्रामपंचायत व यंत्रणा स्तरावरील कामे सुरू करण्यात आली.

ठळक मुद्देकाेराेना काळात आरमाेरी तालुक्यातील नागरिकांना मिळाले काम

महेंद्र रामटेकेलाेकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : कोरोनाच्या काळात घरीच बसून राहणाऱ्या व  हाताला काम नसलेल्या  मजुरांना  प्रशासनाने रोहयोची कामे सुरू करून मोठा आधार दिला आहे. आरमोरी तालुक्यात रोजगार हमी योजनेचे काम ठिकठिकाणी सुरू करण्यात आले आहे. सोमवारी जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे आरमोरी तालुक्यात १६९  रोहयो कामावर ११७९३ मजुरांना रोजगार मिळाला आहे. तसेच चालू आर्थिक वर्षात एप्रिल व मे या दोन महिन्यांत ३३ हजार ३१७ मनुष्यदिन राेजगार निर्मिती झाली आहे.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट ओढवल्यानंतर लाॅकडाऊन करण्यात आले. त्यामुळे अनेकांच्या हाताला  मिळणारे काम व रोजगार बुडाला. हातावर आणून पानावर  खाणाऱ्या शेतकरी शेतमजुरांवर आर्थिक संकट ओढलेले होते.  अशा आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या अनेक शेतमजूर कुटुंबांना रोहयोमुळे दिलासा मिळाला आहे. आरमोरी तालुक्यात प्रशासनाने जारी केलेल्या   लाॅकडाऊनच्या नियमांचे पालन करून मास्कचा वापर, सॅनिटायझर, तापमान व ऑक्सिमीटर तपासणी इत्यादी सोयी-सुविधा कामाच्या ठिकाणी  उपलब्ध करून देऊन व योग्य ती खबरदारी घेऊन आरमोरी तालुक्यात ग्रामपंचायत व यंत्रणा स्तरावरील कामे सुरू करण्यात आली.दिनांक ३१ मे रोजी आरमोरी तालुक्यात  ग्रामपंचायत व यंत्रणा स्तरावर १६९ कामे सुरू करून गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक ११ हजार ७९३ मजुरांना रोजगार हमीच्या कामावर रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. यामध्ये ग्रामपंचायत स्तरावर मजगी, शेतबोडी, भातखाचार, मामा तलाव, नाला सरळीकरण, शोषखड्डे, घरकुल आदी १३५  अकुशल व वैयक्तिक स्वरूपाची कामे सुरू करण्यात आली असून १० हजार ३७५ मजुरांना रोजगार मिळाला आहे. तसेच यंत्रणा स्तरावर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाअंतर्गत फळबाग लागवड व मजगी आदी प्रकारची २६ कामे सुरू करून त्यावर  ९३९ मजुरांना काम देण्यात आले आहे. वन विभागाच्या  मिश्र रोपवनाच्या ४ कामांवर २३ मजूर, जिल्हा परिषदेच्या सिंचाई विभागाच्या मामा तलाव व खोलीकरणाच्या ४ कामांवर ४५६ अशा ग्रामपंचायत व यंत्रणा स्तरावरील १६९ कामांवर ११ हजार ७९३ मजुरांना सोमवारी काम सुरू करून रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. पावसाळा सुरू होईपर्यंत रोहयो कामे सुरू राहणार असून लाॅकडाऊनच्या काळात शासकीय नियमांचे काटेकोर पालन करून व योग्य खबरदारी घेऊन रोहयो कामे सुरू करण्यात आली आहेत.

३००० कुटुंबांनी केली राेजगाराची मागणी

आरमोरी तालुक्यात ३ हजार ११ कुटुंबांनी कामाची मागणी केली होती. त्यानुसार चालू आर्थिक वर्षात एप्रिल व मे २०२१ या दोन महिन्यात ६ हजार ५२ मजुरांना ग्रामपंचायत व यंत्रणा स्तरावर विविध प्रकारची अकुशल कामे उपलब्ध करून देण्यात आली. ३३ हजार ३१७ मनुष्यदिन राेजगार निर्मिती करण्यात आली.

 

टॅग्स :government schemeसरकारी योजनाcorona virusकोरोना वायरस बातम्या