शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ३३ रेतीघाटांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 00:59 IST

रेती घाटांचे लिलाव झाले नसल्याने बांधकामे ठप्प पडली होती. कंत्राटदार, मजूर व सामान्य नागरिक रेती घाटांचे लिलाव होण्याची प्रतीक्षा करीत होते. अखेर रेती घाटांच्या लिलावाची जाहिरात काढण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांचा जीव भांड्यात पडला आहे.

ठळक मुद्देनागरिकांचा जीव भांड्यात : पर्यावरणविषयक परवानगी मिळाली

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : रेती घाटांचे लिलाव झाले नसल्याने बांधकामे ठप्प पडली होती. कंत्राटदार, मजूर व सामान्य नागरिक रेती घाटांचे लिलाव होण्याची प्रतीक्षा करीत होते. अखेर रेती घाटांच्या लिलावाची जाहिरात काढण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांचा जीव भांड्यात पडला आहे.सर्वसाधारणपणे जानेवारी महिन्यात रेती घाट सुरू होतात. मात्र यावर्षी मार्च महिना सुरू झाला तरी रेती घाट सुरू झाले नाही. मागील वर्षीपर्यंत रेती घाटांना परवानगी देण्याचे अधिकार जिल्हास्तरीय समितीकडे देण्यात आले होते. यावर्षीपासून ही परवानगी देण्याचे अधिकार राज्यस्तरीय समितीकडे सोपविण्यात आले. राज्यस्तरावर दोन समित्या आहेत. त्यामुळे यावर्षी रेती घाटांना पर्यावरण विषयक परवानगी मिळण्यास उशीर झाला. रेती घाटांच्या लिलावाची जाहिरात निघणे ही लिलावाची पहिली पायरी आहे. त्यामुळे लिलावाच्या जाहिरातीची नागरिक आवासून वाट बघत होते. महसूल विभागाने जाहिरात काढली आहे. राज्यस्तरीय समितीने जिल्ह्यातील ३३ रेती घाटांना परवानगी दिली आहे. वैनगंगा, खोब्रागडी, सती, कठाणी, पोहार, प्राणहिता, गोदावरी या नद्यांवरील घाटांचा समावेश आहे. ७०० ते ६ हजार ब्रॉसपर्यंतचे रेती घाट आहेत. रेती घाटांचे लिलाव झाल्यानंतर बांधकामांना गती येईलप्रत्यक्ष रेती मिळण्यास लागणार महिना१९ मार्च रोजी ई-लिलाव केला जाणार आहे. लिलाव झाल्यानंतर इतर प्रशासकीय बाबी करण्यास आठ दिवसांचा कालावधी लागेल. पैसे भरणे व रेती घाट मापून देणे, यासाठी जवळपास महिनाभराचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे रेती घाट एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच सुरू होतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :sandवाळू