वासामुंडीत रोवणी : मॅट नर्सरीद्वारे केली होती धान रोप लागवडएटापल्ली : तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने अन्न सुरक्षा अभियानांतर्गत तालुक्यातील वासामुंडी येथे मागील आठवड्यात यंत्राद्वारे रोवणीची ३३ प्रात्यक्षिके घेण्यात आली. मॅट नर्सरीद्वारे धान रोपांची लागवड करून तालुक्यातील वासामुंडी परिसरात सदर प्रात्यक्षिके घेण्यात आली. कृषी जागृती सप्ताह दरम्यान तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांना मॅट नर्सरीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर वासामुंडी गावात राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत यांत्रिकीकरण बाबी अंतर्गत प्रात्यक्षिके घेण्यात आली. शेतकरी राहूल गावडे यांच्या शेतात यांत्रिकीकरणाद्वारे धान रोवणी करण्यात आली. कृषी जागृती सप्ताहादरम्यान धान पिकाच्या व्यवस्थापनासंदर्भात कृषी सेवक एस. व्ही. झंझाड यांनी मार्गदर्शन केले. वासामुंडी येथे ३३ प्रात्यक्षिके घेऊन दोन शेतकरी स्वयंसहाय्यता महिला व पुरूष गटातील सदस्यांना लाभ देण्यात आला. यावेळी कृषी अधिकारी एन. पी. भोयर, गिरासे, विवेक गुंडूरवार उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
यंत्राद्वारे रोवणीची ३३ प्रात्यक्षिके
By admin | Updated: July 31, 2015 01:41 IST