लाेकमत न्यूज नेटवर्ककोरची/कुरखेडा : लोकमत समूहाच्या पुढाकाराने गुरुवारी (दि. १५) जिल्ह्याच्या उत्तर टोकावरील कोरची आणि कुरखेडा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यात कोरचीत ३१, तर कुरखेडा येथे २१ दात्यांनी रक्तदानासाठी समोर येऊन सामाजिक बांधीलकीचा परिचय दिला. कोरची येथे आरोग्य विभाग, ग्रामीण रुग्णालय, महसूल विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी रक्तदानात आपले योगदान दिले. ग्रामीण रुग्णालयात आयोजित या शिबिराच्या उद्घाटनापूर्वी कोरची तालुक्यातील लोकनेते शामलालजी मडावी यांचे बुधवारी आकस्मिक निधन झाल्यामुळे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर रक्तदान शिबिराचे उद्घाटन स्वातंत्र्य सेनानी आणि ‘लोकमत’चे संस्थापक संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करून आणि रिबीन कापून तहसीलदार सी. आर. भंडारी यांनी केले. यावेळी सहउद्घाटक म्हणून गटविकास अधिकारी देवीदास देवरे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बागराज धुर्वे, तर प्रमुख पाहुणे म्हणून मंडळ अधिकारी लाकेश कटरे, बँक ऑफ इंडियाचे शाखा प्रबंधक राम गुप्तेश्वर, समाजसेविका कुमारीबाई जमकातन, डॉ. शुभम वयाळ, डॉ. राहुल राऊत, डॉ. सचिन बर्डे, प्रा. विनोद चहारे, आदी प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा कोरची ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. बागराज धुर्वे यांनी रक्तदानाचे महत्त्व सांगितले. प्रास्ताविक लोकमत प्रतिनिधी लिकेश अंबादे यांनी, तर संचालन ग्रामीण रुग्णालयातील टेक्निशियन प्रमोद सातपुते यांनी केले. शिबिरासाठी सर्व डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, वनश्री महाविद्यालयाचे प्राचार्य तथा राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विनोद चहारे, आदींनी सहकार्य केले.
कर्मचारी, विद्यार्थी, व्यापारीही सरसावलेयावेळी बोटेकसा प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. शुभम वयाळ, ग्रामीण रुग्णालयातील डॉ. राहुल राऊत, कुरखेडाचे जलसंधारण अधिकारी महेश कारेंगुलवार व बोटेकसा प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी, कोरची ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी, कोरची तहसील कार्यालयातील कर्मचारी कोतवाल, वनश्री महाविद्यालयातील रोसेयो स्वयंसेवक विद्यार्थी, शहरातील व्यापारी, नागरिक अशा ३१ जणांनी रक्तदान केले आहे.
ठाणेदारासह राजकीय पदाधिकाऱ्यांचे रक्तदान
लोकमत समूहाच्या वतीने आणि पोलीस स्टेशन यांच्या सहकार्याने कुरखेडा येथील पोलीस स्टेशनच्या इमारतीत आयोजित रक्तदान शिबिरात २१ जणांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन स्वातंत्र्य सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन आणि पुष्पहार अर्पण केल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कमलेश परसवानी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भंवर, तर प्रमुख अतिथी म्हणून ठाणेदार सुधाकर देडे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, माजी नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे, माजी सभापती नागेश फाये, माजी नगरसेवक ॲड. उमेश वालदे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गिरीधर तितराम उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन लोकमत समाचारचे नसिर हाशमी यांनी केले. आभार प्रदर्शन लोकमत तालुका प्रतिनिधी सिराज पठाण यांनी केले. या शिबिरासाठी सागर निरंकारी, अस्सू शेख, पंकज टेंभुर्णे, आदींनी सहकार्य केले. (उर्वरीत वृत्त/पान २)