शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
3
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
4
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
5
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
6
योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?
7
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
8
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
9
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
10
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला
11
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
12
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
13
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
14
कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...
15
अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट
16
"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावरून घसरला; Adani Ent आपटला, डिव्हिस लॅबमध्ये तेजी
19
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...
20
"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

३१ कोटींचे रेतीघाट बेवारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:53 AM

जिल्ह्याच्या सरकारी महसुलात मोठे योगदान देणाऱ्या रेतीघाटांच्या लिलावात यावर्षी खनिकर्म विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे शासनाला नुकसान सहन करावे लागत आहे. आतापर्यंत झालेल्या तीन लिलावांमध्ये अवघा २० कोटी २४ लाख रुपयांचा महसूल शासनाला मिळाला आहे.

ठळक मुद्दे१९ घाट अधांतरी : ५६ घाटांमधून अवघा २०.२४ कोटींचा महसूल

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्याच्या सरकारी महसुलात मोठे योगदान देणाऱ्या रेतीघाटांच्या लिलावात यावर्षी खनिकर्म विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे शासनाला नुकसान सहन करावे लागत आहे. आतापर्यंत झालेल्या तीन लिलावांमध्ये अवघा २० कोटी २४ लाख रुपयांचा महसूल शासनाला मिळाला आहे. मात्र ३१ कोटी ६३ लाख रुपयांचे रेतीघाट अद्यापही लिलावापासून दूर आहेत. परिणामी यातील अनेक घाटांवर रेती माफियांची वक्रदृष्टी पडली असून त्यातून अनधिकृतपणे रेतीचा उपसाही केला जात आहे.यावर्षी भूजल सर्व्हेक्षण यंत्रणा, पर्यावरण समितीच्या परवानगीनंतर जिल्ह्यातील १०१ रेतीघाट लिलावासाठी ठेवले होते. त्यापैकी पहिल्या लिलावात ७३ घाटांवर कंत्राटदारांनी बोली लावली. त्यांची शासकीय किंमत ११ कोटी ९५ हजार ७७ हजार ४०० रुपये होती. मात्र प्रत्यक्षात ते घाट १५ कोटी ९१ लाख १२ हजार ७११ रुपयांना गेले. १३ नोव्हेंबरला काढलेल्या दुसऱ्या लिलावात ८ घाट गेले. त्यांची शासकीय किंमत २ कोटी ८५ लाख २४ हजार २८६ रुपये होती. प्रत्यक्षात या घाटांसाठी ३ कोटी २५ लाख ७३ हजार १७४ रुपये महसूल मिळाला. तिसऱ्या लिलावात ३ रेतीघाटांवर कंत्राटदारांनी बोली लावली. त्यात १ कोटी ७९ लाख २९ हजार ९९८ रुपयांचा महसूल मिळाला. मात्र १७ घाटांवर कोणत्याही कंत्राटदारांनी बोली लावली नाही.गोदावरी, वैनगंगासारख्या मोठ्या नद्यांसोबत इतर नद्यांच्या रेतीघाटांमुळे जिल्ह्याला दरवर्षी मोठा महसूल मिळतो. गोदावरीच्या रेतीघाटांचा कंत्राट घेण्यात तेलंगणातील कंत्राटदारांचा पुढाकार असतो. मात्र यावर्षी रेतीघाटांकडे तेलंगणातील कंत्राटदारांनी पाठ फिरविली आहे. रेतीची मागणी तेलंगणात जास्त प्रमाणात असताना त्यांनी रेतीच्या कंत्राटासाठी बोली का लावली नाही, हे सुद्धा एक कोडेच आहे.कंत्राटदार-अधिकाऱ्यांची मिलीभगत?यावर्षी रेतीघाटांचे तीनही लिलाव मिळून बोली लागलेल्या सर्व घाटांच्या किमतीपेक्षा शिल्लक राहिलेल्या घाटांची किंमत जास्त आहे. मूळ किमतीनुसार या शिल्लक घाटांची किंमत ३१ कोटींपेक्षा जास्त आहे. चौथ्या लिलावात ही किंमत २५ टक्क्यांनी घटविली. मात्र त्याच वेळी उच्च न्यायालयाने सँड मायनिंग प्लॅनची अट घालणारा आदेश दिल्याने तो लिलाव रद्द करावा लागला. मोठ्या रेतीघाटांवर बोली न लावण्यामागे मोठ्या रेती कंत्राटदारांची एकजूट असल्याचे बोलले जाते. कोणीच बोली लावण्यासाठी पुढे यायचे नाही आणि नंतर आपसी समझोत्यातून त्या घाटांमधील रेतीचा अनधिकृत उपसा करायचा, अशी त्यांची योजना आहे. त्यात काही अधिकाऱ्यांनाही त्यांनी हाताशी धरल्याचे सांगितले जाते.मायनिंग प्लॅनची अडचण केव्हा दूर करणार?नदीतील रेतीघाटांमधून रेतीचा उपसा करण्यासाठी रेती उपसा योजना (सँड मायनिंग प्लॅन) असावी, त्याशिवाय कोणत्याही रेतीघाटांमधून रेतीचा उपसा करू नये, अशी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात एका व्यक्तीने दाखल केली आहे. ती याचिका दाखल करून घेत न्यायालयाने सर्वच जिल्ह्यातील रेतीघाटांच्या उपशावर स्थगनादेश दिला आहे. आता सँड मायनिंग प्लॅन केव्हा तयार करणार आणि मोठ्या किमतीच्या रेतीघाटांचा केव्हा लिलाव करणार, तोपर्यंत त्या घाटांमधील रेतीचा चोरट्या मार्गाने उपसा झाल्यास किती रेती शिल्लक राहणार, हे प्रश्न अडचणीचे ठरणार आहे. एकूण परिस्थिती पाहता जिल्हा प्रशासनाला या व्यवहारात बºयाच महसुलावर पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे.