शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

२,८२४ शेततळे अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 23:30 IST

एका पाण्याने धानपीक मरू नये, यासाठी शासनाने मागेल त्याला शेततळे ही योजना सुरू केली आहे. मागील तीन वर्षात ८ हजार १६४ लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेश देण्यात आले. त्यापैकी ५ हजार ३४० शेततळ्यांचे काम पूर्ण झाले आहेत. तर २ हजार ८२४ शेततळे अजुनही अपूर्ण आहेत.

ठळक मुद्दे८,१६४ अर्जांना मंजुरी: कृषी विभागामार्फत सूचना देऊनही शेतकऱ्यांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एका पाण्याने धानपीक मरू नये, यासाठी शासनाने मागेल त्याला शेततळे ही योजना सुरू केली आहे. मागील तीन वर्षात ८ हजार १६४ लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेश देण्यात आले. त्यापैकी ५ हजार ३४० शेततळ्यांचे काम पूर्ण झाले आहेत. तर २ हजार ८२४ शेततळे अजुनही अपूर्ण आहेत.गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. या पिकाला अगदी सुरूवातीपासून ते शेवटपर्यंतच सिंचनाची गरज भासते. मात्र सिंचनाची साधने अत्यंत मर्यादीत आहेत. तलाव, बोड्यांच्या माध्यमातून सिंचन केले जाते. तलाव, बोड्या आटल्यानंतर मात्र धान करपतेवेळी बघितल्याशिवाय शेतकऱ्यांसमोर कोणताच पर्याय राहत नाही. अटीतटीच्या वेळी शेतीला पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाने शेततळे ही योजना सुरू केली. या योजनेंतर्गत मागेल त्याला शेततळे मंजूर करून दिले जात आहेत. २०१६ ते २०१८-१९ या तीन वर्षाच्या कालावधीत कृषी विभागाने ८ हजार १६४ शेततळ्यांना कार्यारंभ आदेश दिले. तीन वर्षांच्या कालावधीत केवळ ५ हजार ३४० शेततळे पूर्ण झाले आहेत. २ हजार ८२3४ शेततळ्यांचे काम शिल्लक आहे. वेळेत काम पूर्ण करावे, याबाबत कृषी विभागातून वेळोवेळी शेतकऱ्यांना सुचिवले जात असले तरी शेतकरी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेततळ्यांचे काम अपूर्णच राहिले आहे.शेततळ्यांबरोबरच आता शेतकरी बोडी दुरूस्तीची मागणी कृषी विभागाकडे करीत आहेत. शेततळ्यापेक्षा बोडी महत्त्वाची आहे.४२८ शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेतशेततळा खोदणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान दिले जाते. अनुदान मिळण्यासाठी सर्वप्रथम शेततळा खोदणे आवश्यक आहे. शेततळा खोदल्याशिवाय अनुदानाची रक्कम कृषी विभाग संबंधित शेतकऱ्याच्या खात्यात जमा करत नाही. शेतकऱ्यांनी स्वत:ची गरज लक्षात घेऊन पैसे उसणेवारी करून शेततळ्याचे काम पूर्ण केले. मात्र वर्ष उलटूनही अनुदान मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. अनुदासाठी वेळोवेळी कृषी विभागाच्या येरझारा घालाव्या लागत आहेत.शेततळे ठरताहेत कुचकामीसिंचनाची सुविधा उपलब्ध होईल, या उद्देशाने शासनाने शेततळ्यांना मंजुरी दिली. शासन १०० टक्के अनुदान देत असल्याने शेतकऱ्यांनीही विचार न करता, शेततळे खोदून घेतले. मात्र पावसाळ्यात ज्यावेळी पाण्याची गरज राहत नाही, त्यावेळी शेततळा भरून राहतो. पाऊस जाताच मात्र शेततळा कोरडा पडत असल्याचा अनुभव शेतकऱ्यांना येत आहे. त्यामुळे ज्यावेळी धानाला पाण्याची गरज राहते, त्यावेळी शेततळ्याचे पाणी राहत नाही. शेततळ्यासाठी शेतीची जवळपास पाव एकर जागा गुंतते. यामध्ये उत्पादन घेणे शक्य होत नाही. हा अनुभव शेतकऱ्यांना यायला लागला असल्याने शेतकरी शेततळे खोदण्याकडे पाठ फिरवित आहेत.

टॅग्स :agricultureशेती