शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

२८ अर्भक व बालकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 05:01 IST

सिरोंचा तालुक्यात अंकिसा, टेकडाताला, मोयाबिनपेठा व झिंगानूर अशी चार प्राथमिक आरोग्य केंद्र असून या केंद्रांतर्गत उपकेंद्र आहेत. अर्भक, बाल व मातामृत्यू रोखण्यासाठी रूग्णालयात म्हणजेच संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण वाढविण्यावर आरोग्य विभागाने भर दिला. यासाठी ग्रामीण भागात जनजागृती करून गर्भवती महिलेची प्रसूती ही रूग्णालयातच करावी, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येते.

ठळक मुद्देबालमृत्यूचे प्रमाण कमी होईना : सिरोंचा तालुक्याच्या ग्रामीण भागातील वर्षभराची स्थिती

कौसर खान।लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : अर्भक व बालमृत्यू रोखण्यासाठी शासन व प्रशासन विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्नशील असले तरी सिरोंचा तालुक्याच्या दुर्गम व संवेदनशील भागात आरोग्य व्यवस्था पाहिजे त्या प्रमाणात बळकट झालेली नाही. तसेच आरोग्यविषयक जनजागृतीचा अभाव असल्याने या तालुक्यात अर्भक व बालमृत्यूचे प्रमाण कायम आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षात एकूण २८ अर्भक व बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे.सिरोंचा तालुक्यात अंकिसा, टेकडाताला, मोयाबिनपेठा व झिंगानूर अशी चार प्राथमिक आरोग्य केंद्र असून या केंद्रांतर्गत उपकेंद्र आहेत. अर्भक, बाल व मातामृत्यू रोखण्यासाठी रूग्णालयात म्हणजेच संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण वाढविण्यावर आरोग्य विभागाने भर दिला. यासाठी ग्रामीण भागात जनजागृती करून गर्भवती महिलेची प्रसूती ही रूग्णालयातच करावी, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येते. मात्र सिरोंचा तालुक्याच्या दुर्गम भागात अशिक्षितपणा, औषधोपचाराबाबत सांशक्ता तसेच पूजारांकडून उपचार करून घेण्यावर अनेकांचा प्रयत्न असतो. या सर्व कारणांमुळे सिरोंचा तालुक्यात अर्भक व बालमृत्यूचे प्रमाण कमी होत नसल्याचे दिसून येत आहे.० ते १० महिने वय असलेल्या बालकाला अर्भक म्हणतात. तर १ ते ५ वर्ष वय असलेल्याला बालक म्हणतात. अंकिसा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ७ अर्भक व ४ बालक असे एकूण ११ मुला-मुलींचा मृत्यू झाला. टेकडाताला प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ५ अर्भक व ३ बालमृत्यू झाले. मोयाबिनपेठा केंद्रांतर्गत ३ नवजात अर्भकांचा मृत्यू झाला. आणि झिंगानूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ५ अर्भक व एका बालकाचा मृत्यू झाला. ही सर्व माहिती तालुका आरोग्य यंत्रणेच्या सुत्राकडून मिळाली आहे.एप्रिल २०१९ ते मार्च २०२० या वर्षभराच्या कालावधीत एकट्या सिरोंचा तालुक्यात २८ अर्भक व बालकांचा मृत्यू झाल्याने आरोग्य सुविधांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.वर्षभरात गर्भवती महिलेचा मृत्यू नाहीजानेवारी २०१९ ते मार्च २०२० या कालावधीत सिरोंचा तालुक्यात एकही गर्भवती महिलेचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला नाही. एकही महिला दगावली नाही, अशी माहिती सिरोंचा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोहर कन्नाके यांनी लोकमतशी बोलताना दिली. गर्भवती मातांना पोषण आहार, औषधी पुरवठा तसेच बालकांना ठरवून दिल्याप्रमाणे मासिक लसीकरण, परिचारिका व आशा स्वयंसेविकांमार्फत केले जाते. प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक पदे रिक्त आहेत. मात्र बालक व अर्भक दगावणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :Socialसामाजिक