शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

२७ पासून हत्तीरोगावर जिल्ह्यात औषधोपचार मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 00:31 IST

हत्तीरोग दूरीकरण मोहिमेअंतर्गत येत्या २७ ते ३१ आॅगस्टदरम्यान जिल्हाभरात एक दिवसीय औषधोपचार डोज दिला जाणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जाणार असून त्यांना योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा हिवताप नियंत्रण अधिकारी डॉ.कुणाल मोडक यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत केले.

ठळक मुद्देघरोघरी वाटणार गोळ्या : ३५१ गावांत जागृती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : हत्तीरोग दूरीकरण मोहिमेअंतर्गत येत्या २७ ते ३१ आॅगस्टदरम्यान जिल्हाभरात एक दिवसीय औषधोपचार डोज दिला जाणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जाणार असून त्यांना योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा हिवताप नियंत्रण अधिकारी डॉ.कुणाल मोडक यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत केले.ज्या डासांमुळे हत्तीरोगाचा संसर्ग होतो तो डास चावला असल्यास जंतूसंसर्ग होऊ नये यासाठी या मोहिमेअंतर्गत आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन गोळ्या देणार आहेत. हत्तीरोगाचा जंतू शरीरात असला तरी त्याचे विशिष्ट लक्षणे दिसून येत नाही. त्यामुळे सर्वांनी या गोळ्या घेतल्यास हत्तीरोगाचा संसर्ग होण्यापासून टाळले जाऊ शकते. विशेष म्हणजे ज्या भागात हत्तीरोगाची शक्यता आहे त्या भागात रक्तनमुने घेण्यासाठी येणारे कर्मचारी रात्री ८ ते १० या वेळेत येणार आहेत.्हत्तीरोगाच्या जंतुचा प्रसार क्युलेक्स डासाच्या मादीमार्फत होतो. सदर डास घाण पाण्यात अंडी देतो. सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावणे, नाल्या वाहत्या करणे, डबकी बुजविणे, झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे, डास उत्पत्तीच्या स्थानांमध्ये गप्पी मासे सोडणे, व्हेन पाईपला जाळी लावणे असे उपाय करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.विदर्भात गडचिरोली जिल्ह्यात हत्तीपाय आणि अंडवृद्धीचे रुग्ण सर्वाधिक आहेत. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी योग्य प्रमाणात जनजागृती करण्यात हा विभाग कमी पडत आहे. त्यासाठी वाढीव निधी देण्याची मागणी होत आहे.२७९७ रुग्ण शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेतजिल्ह्यात जानेवारी ते जुलै यादरम्यान २४० गावांमध्ये अंडवृद्धीच्या रुग्णांची पाहणी, जनजागृती व शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यात २८४१ रुग्ण आढळले. त्यापैकी ३९ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. २७९७ रुग्ण अजूनही शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत.

टॅग्स :Healthआरोग्य