आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन : समाजकल्याणकडे ४७ जोडप्यांची नोंदणीगडचिरोली : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत आंतरजातीय विवाह करणाऱ्या २७ जोडप्यांना आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर अर्थसहाय्य योजनेंतर्गत धनादेश वितरित करण्यात आले. सदर धनादेश वितरणाचा कार्यक्रम मंगळवारला जिल्हा परिषदेच्या वीर बाबुराव शेडमाके सभागृहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे होते. उद्घाटन जि.प. उपाध्यक्ष जीवन नाट यांच्या हस्ते झाले. यावेळी विशेष अतिथी म्हणून जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प.चे समाज कल्याण सभापती विश्वास भोवते, कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय कंकडालवार, अप्पर मुख्य कार्यकारी व्ही. एस. मुळीक, मुख्य लेखा व वित्त अधिकारी डी. बी. राऊत, जि.प. सदस्य डॉ. तामदेव दुधबळे, अशोक इंदूरकर, लैजा चालुरकर तसेच प्रभारी समाज कल्याण अधिकारी आर. के. कोलते, समाज कल्याण निरिक्षक आर. पी. खेडकर आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर धनादेश वितरणाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला. जि.प.च्या समाज कल्याण विभागाकडे २०१० पासून ते जून २०१५ पर्यंत ४७ आंतरजातीय विवाहित जोडप्यांची नोंदणी झाली. यापैकी मंगळवारी आयोजित धनादेश वितरण कार्यक्रमाला २७ जोडपी उपस्थित होते. २०१० मध्ये आंतरजातीय विवाह करणाऱ्या राधा संतोष बावणे या जोडप्याला १५ हजार तर इतर २६ जोडप्यांना प्रत्येकी ५० हजार रूपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन जि.प. रोहयोचे गट विकास अधिकारी एस. टी. पडघन यांनी केले. या कार्यक्रमाला आंतरजातीय विवाह केलेली जोडपी उपस्थित होती. (स्थानिक प्रतिनिधी)जोडप्यांना ५० हजाराचे धनादेश वाटपजि.प. समाज कल्याण विभागातर्फे २६ जोडप्यांना प्रत्येकी ५० हजार रूपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. यामध्ये पूजा निखिल चव्हाण, कांचन श्रीनिवास मगडीवार, सविता सुनील भट्टलवार, नमिता स्वरूप माझी, वैशाली प्रफुल अंबादे, कविता सुशील नगराळे, लक्ष्मी नरेश मडावी, अस्मिता धनराज चौधरी, सरिता भिमा मंडीगेम, छाया महेश बामणवाडे, रोशनी संतोष येमनुरवार, वीणा पंकज दुबे, प्रियंका मुर्लीधर वाटगुरे, ज्योत्स्ना श्यामसुंदर कोसरे, पल्लवी श्रीकांत भिमनपल्लीवार, माधुरी सुनील मेश्राम, शारदा निवेश टेंभुर्णे, सारिका उमेश उईके, प्राजक्ता आशिष गुरनुले, सोनाली पंकज राऊत, वर्षा पराग मसराम, मीनाक्षी ज्ञानेश्वर वालदे, जीवनकला शंकर सडमेक आदींचा समावेश आहे.
२७ जोडप्यांना धनादेशाचे वितरण
By admin | Updated: July 29, 2015 01:45 IST