शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तळोधी व रेगुंठा उपसा सिंचनसाठी २७ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील आमदार धर्मरावबाबा आत्राम, डॉ.देवराव होळी आणि कृष्णा गजबे या आमदारांनी वेळोवेळी या विषयांबाबत पालकमंत्र्यांचे लक्ष वेधून त्यांच्याकडे मागणी केली होती. गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त, संवेदनशील आणि ७६ टक्के वनक्षेत्राने व्यापलेला आहे. त्यामुळे सिंचन क्षमता वाढविण्यासाठी यापूर्वी चिचडोह प्रकल्प मार्गी लागला असून कोटगल प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे.

ठळक मुद्देपुरवणी मागणीत मंजूर : नक्षलग्रस्त भागातील पोलीस विभागाच्या योजनांसाठीही तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील चामोर्शी येथील तळोधी (मोकासा) व सिरोंचा येथील रेगुंठा उपसा सिंचन योजना पूर्ण करण्याकरीता पुरवणी मागणीद्वारे २७ कोटी रु पयांच्या तरतुदीला मंजुरी देण्यात आली. याशिवाय नक्षलग्रस्त भागातील पोलीस विभागाच्या योजनांसाठी ५८ कोटींची तरतूद केली. त्यातील बहुतांश वाटा गडचिरोली जिल्ह्यालाच मिळणार आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता, त्याला यश आले.जिल्ह्यातील आमदार धर्मरावबाबा आत्राम, डॉ.देवराव होळी आणि कृष्णा गजबे या आमदारांनी वेळोवेळी या विषयांबाबत पालकमंत्र्यांचे लक्ष वेधून त्यांच्याकडे मागणी केली होती. गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त, संवेदनशील आणि ७६ टक्के वनक्षेत्राने व्यापलेला आहे. त्यामुळे सिंचन क्षमता वाढविण्यासाठी यापूर्वी चिचडोह प्रकल्प मार्गी लागला असून कोटगल प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे.चामोर्शी तालुक्यातील वैनगंगा नदीवर तळोधी मोकासा येथील उपसा सिंचन प्रकल्पाचे काम, तसेच सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा उपसा सिंचन प्रकल्पाचे काम गतीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने स्थानिक लोकप्रतिनिधींनी पालकमंत्र्यांना विनंती केली होती. ना.विजय वडेट्टीवार यांनी तळोधी उपसा सिंचनसाठी सुधारित प्रस्ताव पाठवण्याचे सूचित केले होते. त्याचे फलित म्हणून या दोन्ही प्रकल्पांसाठी एकूण २७ कोटी रु पयांची तरतूद सन २०२०-२१ च्या पुरवणी मागणीद्वारे मंजूर करण्यात आली. त्यामुळे तळोधी मोकासा प्रकल्पातील १६ गावांमध्ये ६०६२ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे.तसेच रेगुंठा प्रकल्पामुळे १७ गावातील ३२८३ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. या कामासाठी पुढे लागणारा आवश्यक निधी टप्याटप्याने उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.तळोधी मोकासा उपसा सिंचन योजनानक्षलप्रवण आदिवासी भागातील चामोर्शी तालुक्यातील दर्शनीमाल गावाजवळ वैनगंगा नदीच्या डाव्या तिरावर या योजनेचे काम सुरू आहे. या योजनेची प्रस्तावित सुधारित प्रशासकिय मान्यता १५५.४५ कोटी रुपयांची आहे. चिचडोह प्रकल्प पूर्ण झाला असून त्यामुळे या योजनेचे काम पूर्ण झाल्यास यातून शाश्वत सिंचन सुरू ठेवता येणार आहे. आतापर्यंत १९ टक्के खर्च या योजनेवर झाला आहे. यात ८.३२ कोटी रुपये झालेल्या कामापैकी दिले आहेत तर २.३० कोटी देयके देणे बाकी आहेत. सदर प्रकल्पास सध्या मंजूर निधीमुळे गती मिळणार आहे. अंदाजे जून २०२२ मध्ये हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे.रेगुंठा उपसा सिंचन योजनासिरोंचा तालुक्यातील रेगुंठा गावाजवळ प्राणहिता नदीच्या डाव्या तिरावर या योजनेचे काम सुरू होणार आहे. सुधारीत प्रशासकिय मान्यतेसाठी या योजनेचा खर्च १०२.३६ कोटी प्रस्तावित आहे. त्यापैकी १.३७ कोटी खर्च झाला आहे. या योजनेची पूर्ण उभारणी सन २०२४ पर्यंत पूर्ण होणार आहे. यासाठी शासनाकडून टप्याटप्याने निधी वितरण होणार आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पnaxaliteनक्षलवादी