लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अन्न व औषध प्रशासन तसेच स्थानिक गुन्हे शाखेने गडचिरोली तालुक्यातील गुरवळा येथील राहूल वामनराव पोरेड्डीवार याच्या किराणा दुकानातून २६ हजार ६२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर कारवाई मंगळवारी करण्यात आली.राहूल पोरेड्डीवार याने सुगंधीत तंबाखू विक्रीसाठी आणला असून तो सभोवतालच्या दुकानदारांना विकत आहे, अशी गोपनिय माहिती प्राप्त झाली. त्यानुसार दुकानांची झडती घेतली असता, त्याच्या दुकानात सुगंधीत तंबाखूचे डबे आढळून आले. त्याच्यावर अन्न सुरक्षा व मानदे कायदा कलम ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरिक्षक चौगावकर, एएसआय दादाजी करकाडे, गडचिरोलीचे सहायक आयुक्त कांबळे यांच्या मार्गदर्शनात अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर व नमुना सहायक तुकाराम बोडे यांनी केली.सुगंधीत तंबाखू विकणारे किंवा वाहतूक करणारे याबद्दल माहिती असल्यास अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर यांच्या ९४२२१८०९६३ या क्रमांकावर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनिय ठेवले जाईल, असे आवाहन करण्यात आले आहे.
२६ हजारांचा सुगंधीत तंबाखू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 23:59 IST
अन्न व औषध प्रशासन तसेच स्थानिक गुन्हे शाखेने गडचिरोली तालुक्यातील गुरवळा येथील राहूल वामनराव पोरेड्डीवार याच्या किराणा दुकानातून २६ हजार ६२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर कारवाई मंगळवारी करण्यात आली.
२६ हजारांचा सुगंधीत तंबाखू जप्त
ठळक मुद्देमाहिती कळवा : गुरवळा येथील किराणा दुकानदारावर कारवाई