शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

वीज ग्राहकांकडे अडीच कोटींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 23:21 IST

वीज वसुलीसाठी महावितरणतर्फे कडक पावले उचलण्यात येत असली तरी काही ग्राहक नियमितपणे वीज पुवरठा करीत नाही. गडचिरोली मंडळांतर्गत येणाऱ्या एकूण १४ हजार ८५९ ग्राहकांकडे सुमारे २ कोटी ३५ लाख रुपयांचे वीज बिल थकले आहे.

ठळक मुद्देमहावितरणकडून कारवाईस सुरूवात : १४ हजार ८५९ ग्राहकांकडून बील भरण्यास टाळाटाळ

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वीज वसुलीसाठी महावितरणतर्फे कडक पावले उचलण्यात येत असली तरी काही ग्राहक नियमितपणे वीज पुवरठा करीत नाही. गडचिरोली मंडळांतर्गत येणाऱ्या एकूण १४ हजार ८५९ ग्राहकांकडे सुमारे २ कोटी ३५ लाख रुपयांचे वीज बिल थकले आहे. त्यामुळे आता महावितरणने त्यांच्यावर वीज खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे.थकीत वीज बिलामुळे महावितरणची आर्थिक स्थिती अत्यंत कमकुवत झाली आहे. त्यामुळे वीज बिल वसुलीबाबत महावितरणकडून कडक पावले उचलली जात आहेत. एक महिना जरी वीज बिल थकला तरी संबंधित ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित केला जातो.महावितरणतर्फे सप्टेंबर महिन्यापासून राज्यभर केंद्रीकृत बिलिंग प्रणाली सुरू केली आहे. बिलिंगची प्रक्रिया महावितरणच्या सांघिक कार्यालयामार्फत केली जात असल्याने थकबाकीदार ग्राहकांवरही सांघिक कार्यालयाकडून विशेष लक्ष दिले जात आहे. थकबाकीचा वाढता बोजा लक्षात घेता महावितरणला आपला आर्थिक गाडा खेचणे तारेवरची कसरत ठरत आहे. नागपूर परिक्षेत्रांतर्गत एकूण १ लाख ७६ हजार ९७९ ग्राहकांकडे ७० कोटी ३१ लाख रुपये थकले आहेत. त्यापैकी ७ हजार ४ ग्राहकांचा वीज पुरवठा तात्पुरत्या स्वरूपात तर ४ हजार २३६ ग्राहकांचा वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडित केला जात आहे. गडचिरोली मंडळात एकूण १४ हजार ८५९ ग्राहकांकडे २ कोटी ३५ लाख रुपये थकले आहेत. महावितरणने कारवाई करीत सुमारे ३४४ ग्राहकांचा वीज पुरवठा तात्पुरत्या स्वरूपात ४२९ ग्राहकांचा वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडित केला आहे.उन्हाळा सुरू झाल्याने विजेची मागणी वाढणार आहे. त्यामुळे वीज विभागाच्या खर्चातही वाढ होणार आहे. वाढलेला खर्च भरून काढण्यासाठी वसुली होणे आवश्यक आहे. महावितरणने शुन्य थकबाकीचे लक्ष निर्धारीत केले आहे. त्यामुळे थकबाकीदार ग्राहकांवर वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाणार असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.उन्हाळ्यात आता वसुली मोहीम तीव्र केली जाणार असल्यामुळे अनेकांचा वीज पुरवठा खंडित होईल.वीज बिल भरण्यासाठी अनेक पर्याय उपलब्धजिल्ह्यातील बहुतांश वीज ग्राहकांचा मोबाईल क्रमांक महावितरणने नोंदणीकृत केला आहे. त्यामुळे वीज बिलाची अद्यावत माहिती ग्राहकांना एसएमएसच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाते. हा एसएमएस वीज भरणा केंद्रावर दाखवून ग्राहकाला त्याच्या बिलाचा भरणा करणे शक्य आहे. एसएमएसच्या आधारे बिल स्विकृतीस नकार देणाऱ्या कर्मचाऱ्याची महावितरण कार्यालयाकडे तक्रार करण्याची मूभा सुध्दा ग्राहकाला दिली आहे. त्याला काही ग्राहकांनी प्रतिसाद दिला आहे. पूर्वी वीज बिल मिळालेच नाही, अशी तक्रार केली जात होती. आता मात्र ही समस्या दूर झाली आहे. तरीही काही नागरिक मुद्दाम वीज बिलाचा भरणा वेळेवर भरत नसल्याचे दिसून येते. गो ग्रीनच्या माध्यमातून कागदी बिलाऐवजी ईमेलच्या माध्यमातून वीज बिल स्वीकारण्याचा पर्याय ग्राहकाला देण्यात आला आहे. यावर ग्राहकाला वीज बिलात १० रुपयांची सवलतही दिली जात आहे. एसएमएस मिळताच वीज बिलाचा भरणा केल्यास ग्राहकाला वीज बिलात सवलतही दिली जाते.

टॅग्स :electricityवीज