शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

२३४ नागरिकांना घरपोच प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 00:08 IST

भामरागडचे तहसीलदार कैलास अंडील यांच्या पुढाकाराने तलाठी प्रविण पाटील, कोतवाल दौलत तलांडे यांनी भर पावसात २३४ लोकांना जात प्रमाणपत्राचे वाटप केले. विशेष म्हणजे, सदर कर्मचाऱ्यांनी संबंधित नागरिकांना हे दाखले घरपोच पुरविले.

ठळक मुद्देतहसीलदारांचा पुढाकार : जात प्रमाणपत्राने विसामुंडीवासीयांना मिळणार शासकीय योजनेचा लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : भामरागडचे तहसीलदार कैलास अंडील यांच्या पुढाकाराने तलाठी प्रविण पाटील, कोतवाल दौलत तलांडे यांनी भर पावसात २३४ लोकांना जात प्रमाणपत्राचे वाटप केले. विशेष म्हणजे, सदर कर्मचाऱ्यांनी संबंधित नागरिकांना हे दाखले घरपोच पुरविले. जात प्रमाणपत्र मिळाल्यामुळे आता विसामुंडीवासीयांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणे शक्य होणार आहे.दुर्गम भागातील विसामुंडी गावाला जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. याशिवाय मर्दहूर, कत्रणगट्टा, गुंडापूरी आदी गावांना जाण्यासाठी रस्ता नाही. भामरागड तालुका मुख्यालयापासून या गावांचे अंतर ३० ते ३३ किमी आहे. रस्ते व दळणवळणाच्या सोयीअभावी सदर परिसरातील नागरिक जात प्रमाणपत्र काढण्यासाठी भामरागड येथे पोहाचत असतात. मात्र येथे कधी तलाठी मिळत नाही. ग्रामसेवक मिळत नाही. इंटरनेटची समस्या आहे. त्यामुळे आवश्यक असलेले जात प्रमाणपत्र व इतर सर्व प्रमाणपत्रे व दाखले विसामुंडीवासीयांना वेळेत उपलब्ध होत नव्हते. परिणामी या गावातील व परिसरातील बहुतांश नागरिक शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित आहेत. ही बाब लक्षात घेऊन भामरागडचे तहसीलदार कैलास अंडील यांनी महसूल कर्मचाºयामार्फत नागरिकांना घरपोच जात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. दुर्गम भागातील नागरिकांचे दाखल्यांचे प्रस्ताव तयार करून घेण्याचे ठरविण्यत आले. कोटगल साजाच्या तलाठ्यामार्फत आवश्यक दस्तावेज तयार करून ते आॅनलाईन पाठविण्याचे निर्देश दिले. यंत्रणा कामाला लागून प्रमाणपत्र तयार केले. विसामुंडी येथील २३४ नागरिकांना जात प्रमाणपत्राचे घरपोच वितरण करण्यात आले. यावेळी विसामुंडीचे पोलीस पाटील आनंदराव मडावी, शामराव मडावी, अनिल पोरतेटी, गुंडापुरीचे पोलीस पाटील बिरजू हिचामी, कत्रणगट्टाचे पोलीस पाटील मुक्ता मडावी, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक रोहणकर, शिक्षक बंडावार आदी उपस्थित होते. तहसीलदार अंडील यांच्या पुढाकाराने तालुक्याची महसूल यंत्रणा कामाला लागली. त्यामुळे आता कर्मचाºयांमार्फत दररोज नागरिकांना प्रमाणपत्राचे वाटप केले जात आहे.नागरिकांनी व्यक्त केले समाधानभामरागड तालुक्याच्या दुर्गम व अतिदुर्गम गावात रस्ता व वाहतुकीच्या साधनांचा अभाव आहे. त्यामुळे दररोज भामरागड येथे येऊन विविध प्रकारचे प्रमाणपत्र प्राप्त करून घेऊ शकत नाही. ही अडचण लक्षात घेऊन तहसीलदार अंडील यांच्या पुढाकाराने प्रमाणपत्र घरपोच देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

टॅग्स :Tahasildarतहसीलदारgovernment schemeसरकारी योजना