अहेरी : राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत फिरत्या पथकाच्या माध्यमातून महिला आरोग्य अभियान सप्ताहात २५ गावातील २ हजार २७० महिलांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आला.राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण पथक तथा मोबाईल पॅथालॉजी फिरत्या पथकाच्या माध्यमातून २२ रुग्ण गर्भाशयाच्या कर्करोगाने ग्रस्त असल्याचे आढळले. तर दोन रुग्ण स्तनांचा कॅन्सर, २६ रुग्ण उच्च रक्तदाब, १९ मधुमेह, ३२ जणांमध्ये हिमोग्लोबीनचे कमी प्रमाण, ७८ महिला सिकलसेलग्रस्त असल्याचे आढळून आले. यापैकी ९ महिलांना उच्चस्तरावर उपचारासाठी हलविण्यात आले आहे. एक हजार ४१९ महिलांचा औषधोपचार एनसीडीच्या माध्यमातून करण्यात आला. तसेच फिरत्या पथकाने ८५१ महिलांवर औषधोपचार केला. शिबिरात अहेरी, आलापल्ली, नागेपल्ली, येलचिल, वट्रा, पुसडपल्ली, खमचेरू, देवलमारी, इंदाराम, कन्नेपल्ली, वेलगूर येथे औषधोपचार करण्यात आला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी, टीएचओ डॉ. शिवराम कुंभरे, डॉ. प्रियंका गेडाम, लोचन श्रीखंडे, दीप्ती कोहळे, प्रीती आत्राम, मनीषा कांचनवार, संजू पोटे, महेंद्र बांदुरकर, झिंगे, मडावी यांनी सहकार्य केले.
२२७० महिलांची आरोग्य तपासणी
By admin | Updated: March 22, 2015 00:33 IST