सात ठिकाणी : २०० उमेदवारी अर्ज दाखलगडचिरोली : नऊ नगर पंचायतपैकी सात नगर पंचायत निवडणुकीसाठी बुधवारी एकूण २२३ नामांकन अर्ज दाखल झाले. यामध्ये सर्वाधिक चामोर्शी नगर पंचायतसाठी ५९ नामांकन अर्ज दाखल झाले आहेत. बुधवारी एकाच दिवशी भामरागड नगर पंचायतीसाठी ४२, सिरोंचा नगर पंचायतीसाठी ५५, अहेरी २७, एटापल्ली २४ व कुरखेडा नगर पंचायत निवडणुकीसाठी पाच तर मुलचेरा नगर पंचायतीसाठी ११ नामांकन अर्ज दाखल झाले. भामरागड सिरोंचा, अहेरी, एटापल्ली, चामोर्शी व कुरखेडा या सहा नगर पंचायती मिळून आतापर्यंत एकूण २५६ नामांकन अर्ज दाखल झाले आहेत. तर कोरची व धानोरा या दोन नगर पंचायतीसाठी बुधवारी एकही नामांकन अर्ज दाखल झाले नाही. सहा नगर पंचायती मिळून आतापर्यंत एकूण २०० उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज दाखल करून उमेदवारी निश्चित केले आहे. एटापल्ली नगर पंचायतीसाठी मंगळवारी १, बुधवारी ५५ असे एकूण ५६ नामांकन अर्ज दाखल झाले आहे. भामरागड नगर पंचायतीसाठी आतापर्यंत एकूण ५५ नामांकन अर्ज दाखल करण्यात आले आहे. या नगर पंचायतमध्ये आतापर्यंत ४६ उमेदवार झाले आहेत. बुधवारी भामरागड नगर पंचायतीसाठी ४२ नामांकन अर्ज दाखल झाले. आतापर्यंत अहेरी नगर पंचायतीसाठी ३२, एटापल्ली २६, चामोर्शी ८२ व कुरखेडामध्ये पाच नामांकन अर्ज दाखल झाले आहेत.
एकाच दिवशी २२३ नामांकन दाखल
By admin | Updated: October 8, 2015 00:53 IST