धानोरा : सीआरपीएफ ११३ बटालीयनद्वारे धानोरा ते येरकड दरम्यान १२ किमीची मिनी मॅराथॉन स्पर्धा रविवारी घेण्यात आली. या स्पर्धेत १४८ युवक व ७२ युवती अशा एकूण २२० स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत युवकांमध्ये बिसेन ताडाम प्रथम आला. त्याला एलईडी टीव्ही व ट्राफी देण्यात आली. द्वितीय क्रमांक आकाश शेंडे याने पटकाविला. तृतीय क्रमांक विनोद मडावी याने पटकाविला. युवतींमध्ये शुभांगी किरंगे हिने प्रथम क्रमांक पटकाविला. तिला एलईडी टीव्ही देण्यात आली. द्वितीय क्रमांक सुप्रिया किरंगे तर तृतीय क्रमांक स्नेहल वाडगुरे हिने पटकाविला. विजेत्यांना नगराध्यक्ष वर्षा चिमुरकर, बटालीयनचे कमांडंट एम. शिवशंकरन, द्वितीय कमांडंट जे. पी. सॅम्युअल, सहा. कमांडंट विकास कुमार, विकाससिंह, डॉ. परेश गोटपगार, अमोल वडसंघ, प्रा. किरमिरे, कुंदन दुपारे, महेश चिमुरकर यांच्या हस्ते बक्षीस वितरित करण्यात आले. यावेळी शेकडो युवक, युवती उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
मिनी मॅरेथॉनमध्ये धावले २२० युवा
By admin | Updated: January 23, 2017 00:51 IST