शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

छत्तीसगडमध्ये ३० नक्षलवाद्यांचा खात्मा; राखीव दलाचा एक जवान शहीद

By गेापाल लाजुरकर | Updated: March 20, 2025 18:41 IST

Gadchiroli : दाेन जिल्ह्यांत चकमकी; महिनाभरात १८ नक्षलवाद्यांना अटक

गाेपाल लाजूरकर, गडचिराेलीगडचिरोली : छत्तीसगड राज्याच्या बिजापूर-दंतेवाडा व कांकेर- नारायणपूर जिल्ह्याच्या सीमेवर गुरुवारी (दि.२० मार्च) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास दोन वेगवेगळ्या पाेलिस- नक्षली चकमकी उडाल्या. या दाेन्ही चकमकीत ३० नक्षलवादी ठार झाले. मात्र, एक जिल्हा राखीव दलातील जवान शहीद झाला. बिजापूर २६ नक्षलवादी ठार तर कांकेरमध्ये ४ नक्षलवादी ठार एकूण ३० नक्षलवादी ठार झाले. 

छत्तीसगडच्या बिजापूर-दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमाभागातील गंगलूर जंगल परिसरात पाेलिसांना लक्ष्य करण्याच्या उद्देशाने मोठ्या संख्येने नक्षलवादी एकत्र आल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून गुरुवारी इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरात जिल्हा राखीव रक्षक दल, विशेष कार्य दल आणि बस्तर फायटर्ससह संयुक्त सुरक्षा दलांनी नक्षल्यांविरोधात अभियान राबविले. याचवेळी जंगलात दडून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. यावेळी पोलिसांनी केलेल्या गाेळीबारात २६ नक्षलवादी ठार झाले. यात बिजापूर जिल्हा राखीव दलातील एक जवान शहीद झाला.

कांकेर-नारायणपूर जिल्ह्याच्या सीमाभागात दुसरी चकमक उडाली. यात चार नक्षलवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा जवानांना यश आले. दोन्ही घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.

महिनाभरात १८ नक्षलवाद्यांना अटकनव्या वर्षाच्या सुरुवातीला ९ फेब्रुवारीला बिजापूर जिल्ह्यातील जंगलात झालेल्या चकमकीत ३१ नक्षल्यांना ठार करण्यात आले होते. यावेळी दाेन जवान शहीद झाले होते. मागील आठवड्यात छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात तब्बल १७ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले होते. फेब्रुवारीमध्ये तीन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत एकूण १८ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली हाेती.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीnaxaliteनक्षलवादी