शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

२२ शाळांना अनुदान

By admin | Updated: July 1, 2014 23:28 IST

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी शिक्षण क्षेत्रात अनेक क्रांतिकारक निर्णय घेतलेत. या निर्णयामुळे नक्षलग्रस्त व ग्रामीण भागातील शाळांमधील शैक्षणिक दर्जा सुधारण्यास मोठी मदत झाली आहे.

गडचिरोली जिल्ह्यात : शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयाचा फायदागडचिरोली : राज्याचे शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी शिक्षण क्षेत्रात अनेक क्रांतिकारक निर्णय घेतलेत. या निर्णयामुळे नक्षलग्रस्त व ग्रामीण भागातील शाळांमधील शैक्षणिक दर्जा सुधारण्यास मोठी मदत झाली आहे. गेल्या अनेक वर्षापासून कायम विनाअनुदानीत तत्वावर चालविल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील तब्बल २२ शाळा शासकीय अनुदानासाठी पात्र ठरल्या आहेत.२४ नोव्हेंबर २००१ च्या शासन निर्णयानुसार राज्यात कायमविना अनुदान तत्वावर शाळा सुरू करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. २० जून २००९ च्या निर्णयान्वये या शाळांचा कायम शब्द वगळूनन त्या २०१२-१३ पासून मूल्यांकनाचे विहित निकष पूर्ण करणाऱ्या शाळा अनुदानासाठी पात्र ठरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे व या निकषाची पूर्तता गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यात २२ शाळांनी केल्याने त्यांना आता शासकीय अनुदानासाठी पात्र ठरविण्यात आले आहे. या शाळांमध्ये गडचिरोली तालुक्यात संजिवनी विद्यालय नवेगाव, कै. नामदेवराव उईके माध्यकि विद्यालय चुरचुरा, विदर्भ विद्यालय पोटेगाव, सिध्दार्थ विद्यालय मारोडा, अहेरी तालुक्यात बोरी येथील स्व. विमलताई ओल्लालवार हायस्कूल, चामोर्शी तालुक्यात स्व. मंगरूजी पाटील कोवासे विद्यालय भाडभिडी, आकाश विद्यालय जयरामपूर, लोकमान्य हिंदी माध्यमिक विद्यालय गौरीपूर, भारतरत्न राजीव गांधी माध्यमिक विद्यालय मुरखळा, त्यागमूर्ती सोनिया गांधी माध्यमिक विद्यालय मोहली, परमपुज्य महात्मा गांधी विद्यालय घोट, देसाईगंज तालुक्यात शिवाजी विद्यालय तुळशी, लोकसेवा माध्यमिक विद्यालय आमगाव, धानोरा तालुक्यात जयपेरसापेन माध्यमिक विद्यालय जांभळी, महाराष्ट्र विद्यालय मुस्का, शंकरराव बल्लमवार हायस्कूल मेंढाटोला, कोरची तालुक्यात राष्ट्रीय विद्यालय बिहिटेकला, युवास्पंदन विद्यालय भिमपूर, कुरखेडा तालुक्यात कुथे पाटील गोठणगाव, महात्मा फुले विद्यालय कराडी या शाळांचा अनुदानासाठी पात्र शाळांमध्ये समावेश आहे. वरील शाळांना मूल्यांकनाच्या निकषानुसार ज्या वर्षी मूल्यांकनात पात्र ठरतील. त्यावर्षीपासून २० टक्के व त्यापुढील वर्षी अनुक्रमे ४०, ६०, ८० व १०० टक्के या प्रमाणात अनुदान पात्र ठरतील. गडचिरोली जिल्ह्यात कायमविना अनुदानित ६५ शाळा असून यापूर्वी फक्त २ शाळांना व आता २२ शाळांना अशा एकूण २४ शाळांना अनुदानासाठी पात्र ठरविण्यात आले आहे. अद्याप ४१ शाळा अनुदानास पात्र ठरावयाच्या आहे. शिक्षण विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षापासून या शाळांमध्ये काम करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.