शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
2
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
3
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
4
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
5
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
6
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
7
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
8
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
9
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
10
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
11
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
12
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
13
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
14
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
15
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
16
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
17
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
18
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
19
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
20
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 

सिरोंचात २१७ बालके कुपोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 05:00 IST

राज्यात कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यासाठी राज्यशासन व आरोग्य यंत्रणा विविध उपाययोजना आखत आहेत. स्वयंसेवी संस्थांमार्फत कुपोषण निर्मूलनाचे काम गडचिरोली जिल्ह्यात सुरू आहे. सर्च संस्थेचे संचालक डॉ.अभय बंग व डॉ.राणी बंग यांच्यामार्फतीने शासन कुपोषण निर्मूलनासाठी विविध उपक्रम राबवित आहेत.

ठळक मुद्देआरोग्य यंत्रणा बळकट नाही । जनजागृतीसह पोष्टीक अन्न पुरविण्याची गरज

कौसर खान ।लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : गर्भवती महिलेची प्रकृती चांगली असल्यास सुदृढ बाळ जन्माला येतो. मात्र सिरोंचा तालुक्यात आरोग्य सोयीसुविधेचा अभाव, गरीबी, अज्ञानता, जनजागृतीचा अभाव आदी कारणांमुळे कुपोषित बालकांची समस्या कायम आहे. जानेवारी २०२० च्या आकडेवारीनुसार २१७ कुपोषित बालके आढळून आली.राज्यात कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यासाठी राज्यशासन व आरोग्य यंत्रणा विविध उपाययोजना आखत आहेत. स्वयंसेवी संस्थांमार्फत कुपोषण निर्मूलनाचे काम गडचिरोली जिल्ह्यात सुरू आहे. सर्च संस्थेचे संचालक डॉ.अभय बंग व डॉ.राणी बंग यांच्यामार्फतीने शासन कुपोषण निर्मूलनासाठी विविध उपक्रम राबवित आहेत. केंद्र व राज्य सरकारचा कोट्यवधी रुपयांचा निधी कुपोषण निर्मूलनाच्या कामावर आजवर खर्च झाला. मात्र जिल्ह्याच्या आदिवासी व जंगलव्याप्त भागातील बालकांच्या कुपोषणाची समस्या कमी झाली नाही. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाअंतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाकडून आरोग्य सेवेचे कार्य केले जाते. सिरोंचा तालुक्यात अंकिसा, मोयाबीन पेठा, टेकडाताला व झिंगानूर आदी चार प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. जानेवारी २०२० च्या अहवालानुसार या चारही प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत एकूण २१७ बालके कुपोषित आढळून आली. यामध्ये अंकिसा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत ११० बालकांचा समावेश आहे. यामध्ये ५९ मुले व ५१ मुलींचा समावेश आहे. मोयाबीनपेठा आरोग्य केंद्राअंतर्गत ३ मुले व ९ मुली अशी एकूण १२, टेकडाताला प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत ५२ मुले व २८ मुली अशा एकूण ८० बालके कुपोषित आढळून आली. झिंगानूर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत १५ बालके कुपोषित आढळून आली. यामध्ये ११ मुले व ४ मुलींचा समावेश आहे. सदर कुपोषित बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले असून सॅम व मॅम या प्रकारात आढळलेली बालके आहेत. वजनानुसार साधारण ग्रेडमध्ये चारही पीएचसीअंतर्गत एकूण २८ बालके आहेत. मध्यम स्वरूपाचे ११३ तर तीव्र कुपोषित म्हणून ७६ बालके आढळून आली. शासनाकडून अनुदान प्राप्त होऊनही कुपोषणाची समस्या पूर्णत: सुटली नाही.चारही केंद्रात डॉक्टरांची पदे रिक्तसिरोंचा तालुक्यातील अंकिसा, मोयाबिनपेठा, टेकडाताला व झिंगानूर या चार प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांची प्रत्येकी एक पद रिक्त आहे. विशेष म्हणजे गट ‘ब’ श्रेणीचे वैद्यकीय अधिकारी येथे नाही. याशिवाय आरोग्य कर्मचाऱ्यांचीही पदे रिक्त आहेत. तालुक्यात प्राथमिक आरोग्य पथक आहे. या पथकामध्ये सुद्धा डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. परिचारिका, परिचर व इतर पदे प्राथमिक आरोग्य केंद्रात रिक्त असल्याने याचा परिणाम आरोग्य सेवेवर होत आहे. आरोग्य यंत्रणेतील काही अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहून सेवा देत नाही. त्यामुळे औषधोपचार वेळेवर मिळत नसल्याची तालुक्यातील नागरिकांची ओरड आहे. कुपोषण निर्मूलनासाठी रिक्तपदे भरून आरोग्य यंत्रणा बळकट करण्याची गरज आहे.