शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

यावर्षी २१४० जणांना हिवतापाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 00:45 IST

राज्यात सर्वाधिक हिवतापाचे रुग्ण आढळत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात गेल्यावर्षीपर्यंत मोठ्या प्रमाणात मच्छरदाण्यांचे वाटप झाले. यावर्षीही १ लाख ६ हजार ३० मच्छरदाण्यांचे वाटप झाले असून अजूनही ७९ हजार मच्छरदाण्या शिल्लक आहेत.

ठळक मुद्देरुग्णांचे प्रमाण घटले : ७९ हजार मच्छरदाण्या शिल्लक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्यात सर्वाधिक हिवतापाचे रुग्ण आढळत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात गेल्यावर्षीपर्यंत मोठ्या प्रमाणात मच्छरदाण्यांचे वाटप झाले. यावर्षीही १ लाख ६ हजार ३० मच्छरदाण्यांचे वाटप झाले असून अजूनही ७९ हजार मच्छरदाण्या शिल्लक आहेत. मात्र तीन वर्षात पुरेशा प्रमाणात मच्छरदाण्या वाटप झाल्याने यावर्षी हिवतापाचे प्रमाण घटले असून गेल्यावर्षीच्या तुलनेत अर्ध्यापेक्षाही कमी लोकांना हिवतापाची लागण झाल्याची नोंद हिवताप नियंत्रण विभागाने घेतली आहे.७६ टक्के जंगलाचे क्षेत्र असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात डासांचे प्रमाण जास्त असते. जंगलालगतच्या गावांमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात हिवताप, डेंग्यूासारख्या डासजन्य आजारांचे रुग्ण आढळतात. वेळेवर योग्य उपचार मिळत नसल्याने अनेक जण दगावतात. यावर उपाय म्हणून केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून मलेरियाचा उद्रेक होणाऱ्या गावांमध्ये नागरिकांना मोफत मच्छरदाण्यांचे वाटप करण्यात येत आहे. गेल्या तीन वर्षात ४ लाखांपेक्षा अधिक मच्छरदाण्यांचे वाटप जिल्ह्यात झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून डासजन्य आजारांचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येते. मच्छरदाण्या वाटण्याची केंद्र व राज्य सरकारकडून मच्छरदाण्यांचा पुरवठा केला जात असला तरी काही प्रमाणात स्थानिक स्तरावरही मच्छरदाण्यांची खरेदी झाली. ७९ हजार मच्छरदाण्या शिल्लक असल्यामुळे यातील काही मच्छरदाण्यांची खरेदी अनावश्यक ठरली आहे.१६६१ गावांत डासनाशकाची फवारणीडासांचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हाभरात डासनाशक औषधाची फवारणी केली जाते. यात १३ जून ते ५ सप्टेंबरदरम्यान राबविलेल्या पहिल्या टप्प्यात ४७ प्राथमिक आरोग्य केंद्रातील ३७६ उपकेंद्रांतर्गत येणाºया १६६१ गावांमध्ये डासनाशक फवारण्यात आले. दुसºया टप्प्यात १७ सप्टेंबरपासून आतापर्यंत ७२६ गावांमध्ये फवारणी आटोपली आहे. आदिवासीबहुल गावांमध्ये लोक दिवसा घरी सापडत नसल्यामुळे सायंकाळी जाऊन फवारणी करावी लागत आहे. डासनाशक पचवण्याची डासांची क्षमता दरवर्षी वाढत असल्यामुळे दर तीन वर्षांनी औषध बदलविले जाते. सध्या लॅम्बडा (सायलोथ्रीन) या औषधाची फवारणी केली जात आहे.अर्ध्यावर आले हिवतापाचे प्रमाणयावर्षी जानेवारी ते आॅक्टोबर या १० महिन्यात ४ लाख ६२ हजार १९६ रुग्णांचे रक्तनमुणे तपासण्यात आले. त्यापैकी २१४० जणांना हिवतापाची लागण झाल्याचे आढळून आले. त्यापैकी २ जणांचा मृत्यू झाला. गेल्यावर्षी याच कालावधीत ४११९ जणांना मलेरियाने ग्रासले होते आणि ४ जणांचा मृत्यू झाला होता. यावर्षी घटलेले हिवतापाचे प्रमाण हे मच्छरदाण्यांचा वापर आणि योग्य फवारणीचा परिणाम असल्याचे दिसून येते.

टॅग्स :Healthआरोग्य