शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

मध्यरात्री 'तो' घराबाहेर पडला अन् गळफास लावून केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2022 17:37 IST

बुधवारी सकाळी तो घरी आला नव्हता. त्यामुळे शोध घेतला असता मरकेगाव तुकुम रोडपासून १० ते १५ फूट अंतरावर असलेल्या पळसाच्या झाडावर स्वतःच्या दुपट्ट्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत तो आढळला. 

ठळक मुद्दे कारण अस्पष्ट

धानोरा (गडचिरोली) : मध्यरात्री घरातून अचानक बेपत्ता झालेला युवक सकाळी घराजवळच्या झाडावर गळफास घेतलेल्या अवस्थेत बुधवारी (दि. २३) सकाळी आढळला. विजय दिवाकर तोफा (वय २०) असे त्या युवकाचे नाव असून, त्याच्या या कृत्यामागील कारण मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. ही घटना ग्रामपंचायत तुकुम हद्दीत येत असलेल्या मरकेगाव येथे घडली.

मृत विजय हा मंगळवारी रात्री घरात आई, आजी आणि दोन भाऊ यांच्यासोबत झोपला होता. आईला मध्यरात्री रात्री जाग आली असता विजय झोपलेला दिसला नाही. तो कुठे गेला असेल असा प्रश्नही तिला पडला; पण तो थोडा भ्रमिष्टासारखा वागत असल्याने कुठेतरी जवळपास गेला असेल असे म्हणून ती झोपी गेली. बुधवारी सकाळी तो घरी आला नव्हता. त्यामुळे शोध घेतला असता मरकेगाव तुकुम रोडपासून १० ते १५ फूट अंतरावर असलेल्या पळसाच्या झाडावर स्वतःच्या दुपट्ट्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत तो आढळला. याबाबत धानोरा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला. अधिक तपास सुरू आहे.

अवघ्या १२ दिवसांत तीन आत्महत्या

धानोरा येथे जेमतेम १२ दिवसांत तीन आत्महत्येच्या घटना घडल्याने खळबळ माजली आहे. पहिल्या घटनेत १० मार्च रोजी सीआरपीएफ कॅम्प धानोरा येथे एका सीआरपीएफ जवानाने स्वतःच्या बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली होती. दुसऱ्या घटनेत १६ मार्चला धानोरा टोला येथील अविवाहित युवतीने विष घेऊन आत्महत्या केली. आता या तिसऱ्या घटनेत युवकाने गळफास घेतला. त्यामुळे या घटना चर्चेचा विषय झाल्या आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूGadchiroliगडचिरोली