लोकमतचा उपक्रम : स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; गडचिरोली, आरमोरी येथील केंद्रावर परीक्षागडचिरोली : लोकमत तथा पेस यांच्या तर्फे घेण्यात आलेल्या टॅलेंट सर्च परीक्षेत जिल्ह्यातील २ हजार ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. इयत्ता आठवी, नववी व दहावी करिता घेण्यात आलेली परीक्षा विविध केंद्रांवर घेण्यात आली. गडचिरोली येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये २० डिसेंबरला टॅलेंट सर्च परीक्षा घेण्यात आली. तसेच वसंत विद्यालय, गोंडवाना सैनिकी विद्यालय, गडचिरोली, आरमोरी येथील पॅराडाईज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये टॅलेंट सर्च परीक्षा घेण्यात आली. वसंत विद्यालयात मुख्याध्यापक लाकडे, करोडकर, गावतुरे, चहांदे, कामडी व इतर शिक्षकांनी सहकार्य केले. गोंडवाना सैनिकी विद्यालयात प्राचार्य संजय भांडारकर, अजय वानखेडे, नरेंद्र उंदीरवाडे, गणेश बावणकुळे, प्रेमसुधा मडावी, संतोष कुळमेथे, पॅराडाईज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विजयालक्ष्मी कवंडर, यशोदा नेऊलकर, सुजाता अवचट, मिनाज शेख, निर्मला नवरत्ने, नितूराणी मालाकर यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)
२ हजार ३०० विद्यार्थ्यांनी दिली टॅलेंट सर्च परीक्षा
By admin | Updated: December 25, 2015 02:09 IST