शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

१९ मडकी मोहसडवा व दारू नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 22:31 IST

तालुक्यातील परसवाडी टोला येथे मुक्तिपथ गाव संघटनेने अहिंसक कृतीद्वारे २० दारूविक्रेत्यांना नोटीस दिली. सहा जणांच्या घराची झडती घेत व आसपासच्या शिवारात शोधमोहीम राबवून १९ मडके मोहसडवा आणि गावठी दारू जप्त करून ती मंगळवारी नष्ट केली.

ठळक मुद्दे२० दारूविक्रेत्यांना नोटीस : परसवाडी येथे मुक्तीपथ गाव संघटनेचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : तालुक्यातील परसवाडी टोला येथे मुक्तिपथ गाव संघटनेने अहिंसक कृतीद्वारे २० दारूविक्रेत्यांना नोटीस दिली. सहा जणांच्या घराची झडती घेत व आसपासच्या शिवारात शोधमोहीम राबवून १९ मडके मोहसडवा आणि गावठी दारू जप्त करून ती मंगळवारी नष्ट केली. सोबतच विशेष ग्रामसभेत ठराव घेऊन विक्रेत्यांना आवश्यक दाखले व रेशनकार्डचा लाभ मिळणार नसल्याचा ठराव घेतला. रोजगार हमी योजनेच्या कामावरून कमी करण्याचाही ठराव ग्रामसभेने घेतला.परसवाडी टोला येथे मोठ्या प्रमाणात दारूविक्री होते. त्यामुळे गावातील महिला त्रस्त झाल्या होत्या. गावातील दारूविक्री बंद होण्यासाठी काही दिवसांपूर्वी मुक्तिपथ गाव संघटनेद्वारे दारूबंदी संदर्भात विशेष ग्रामसभा घेतली. या ग्रामसभेत दारूविक्री बंद करण्याचा ठराव घेण्यात आला.गावात २० दारूविक्रेते असल्याचे या सभेत निदर्शनास आले. त्यांच्याविरोधात कठोर कृती करून सर्वांना विक्री बंद करण्याबाबत वैयक्तिक नोटीस देण्यात आली. त्याचबरोबर गावात एक जाहीर नोटीस लावून दारूविक्री करताना आढळल्यास ग्रामपंचायत कडून आवश्यक दाखले मिळणार नसल्याचे सांगण्यात आले.रेशनकार्डवर मिळणाऱ्या सुविधाचा लाभही थांबविला जाणार असून विक्रेत्यांना रोजगार हमी योजनेच्या कामावरूनही कमी करण्यात आले.कठोर कृती करूनही यातील सहा विक्रेत्यांनी दारूविक्री सुरूच ठेवली. त्यामुळे गाव संघटनेने त्यांच्या घरी धाड मारली. सोबतच जवळच्या शिवारात शोधमोहीम राबवून १९ मडकी मोहसडवा आणि तीन डबकी दारू सापडली.दारू गळण्याचे साहित्य आणि जप्त केलेली दारू संघटनेने नष्ट केली. जवळपास ५० गावकरी या अहिंसक कृतीत सहभागी झाले होते.महिलेच्या घरी सापडली ३० लिटर दारूपरसवाडी टोला गावात महिला दारूविक्रेत्यांची संख्याही मोठी आहेत. यातील एका महिलेच्या घरी धाड मारली असता ३० लिटर मोहाची दारू व १ ड्रम सडवा सापडला. दारू आणि सर्व साहित्य नष्ट करून या महिलेला दारूविक्री बंद करण्याबाबत समज देण्यात आली.

टॅग्स :liquor banदारूबंदी