शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
6
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
7
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
8
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
9
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
10
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
11
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
12
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
13
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
14
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
15
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
16
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
17
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
18
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
19
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
20
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी

आरोग्य व इतर सुविधांसाठी केली ११ कोटींची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 00:10 IST

गडचिरोली शहरात नगर परिषदेमार्फत नगर परिषदेमार्फत पाणीपुरवठा केला जाते. प्रत्येक नळ जोडधारकाकडून नगर परिषद दीड हजार रुपये प्रती वर्ष कर गोळा करणार आहे. २०२०-२१ या वर्षात पाणीपट्टीच्या माध्यमातून १ कोटी ४६ लाख रुपये उत्पन्न मिळणार आहे. पाणीपुरवठ्यावर वर्षभरात होणारा खर्च २ कोटी ७७ लाख ६० हजार रुपये आहे.

ठळक मुद्देपाणी पुरवठा योजना तोट्यातच : गडचिरोली न.प.चा अर्थसंकल्प

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शहरवासीयांसाठी आवश्यक असलेल्या आरोग्यविषयक बाबी आणि इतर सुविधांचे महत्त्व लक्षात घेता त्यासाठी नगर परिषदेच्या अंदाजपत्रकात सुमारे ११ कोटी ७ लाख ९४ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सदर निधी आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा व इतर महत्त्वाच्या बाबींवर खर्च केला जाणार आहे. जनतेच्या दृष्टीने सोयीसुविधांचे महत्त्व लक्षात घेता मागील वर्षीच्या तुलनेत दोन कोटी रुपयांची अधिकची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे.गडचिरोली शहरात नगर परिषदेमार्फत नगर परिषदेमार्फत पाणीपुरवठा केला जाते. प्रत्येक नळ जोडधारकाकडून नगर परिषद दीड हजार रुपये प्रती वर्ष कर गोळा करणार आहे. २०२०-२१ या वर्षात पाणीपट्टीच्या माध्यमातून १ कोटी ४६ लाख रुपये उत्पन्न मिळणार आहे. पाणीपुरवठ्यावर वर्षभरात होणारा खर्च २ कोटी ७७ लाख ६० हजार रुपये आहे. नगर परिषदेला मिळणाऱ्या उत्पन्नाच्या तुलनेत पाणीपुरवठ्यावर होणारा खर्च १ कोटी ३१ लाख रुपयांनी अधिक आहे. पाणीपुरवठा विभागाच्या स्थायी आस्थापनेवर ३० हजार लाख रुपये, अस्थायी अस्थापनेवर ९ लाख रुपये खर्च होणार आहे. बोअरवेल दुरूस्ती व पाईपलाईन लिकेज दुरूस्तीसाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी ३ लाख रुपयांची तरतूद आहे. आलम खरेदीसाठी १५ लाख रुपये, ब्लिचिंग पावडर व क्लोरिन गॅस खरेदीसाठी १६ लाख रुपयांची तरतूद आहे.सार्वजनिक विहिरींच्या दुरूस्तीसाठी १० लाख रुपयांची तरतूद केली आहे. नगर परिषदेकडे काही वाहने आहेत. या वाहनांच्या देखभाल व दुरूस्तीसाठी चार लाख रुपयांची तरतूद आहे. पाणपोईसाठी एक लाख रुपये, आपत्ती व्यवस्थापनासाठी दोन लाख रुपये, स्वच्छ सर्वेक्षणासाठी अडीच लाख रुपये, सफाई कामगारांना ड्रेस, मोजे खरेदी करण्यासाठी दोन लाख रुपये, दुर्बल घटकांना अंत्यसंस्काराला लाकडे पुरविण्यासाठी ६० हजार रुपयांची तरतूद केली आहे.नगर परिषदेत भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी सत्तारूढ आहेत. राज्यात महाआघाडी सरकार सत्तारूढ होण्याआधी सत्तेत असलेल्या भाजप सरकारने शेवटच्या टप्प्यात अनेक नगर परिषदांना भरीव निधी दिला होता. तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे काही दिवस जिल्ह्याचे पालकत्व आल्यानंतर त्यांनीही न.प.ला निधीची दिला होता.प्राधिकरणच्या कर्जाची परतफेडगडचिरोली शहराची पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत बांधण्यात आली. यासाठी नगर परिषदेने प्राधिकरणकडून कर्ज घेतले होते. मात्र मागील अनेक वर्ष या कर्जाची परतफेड केली जात नव्हती. त्यामुळे या कर्जावरील व्याज वाढतच चालले होते. मागील वर्षीपासून या कर्जाची परतफेड केली जात आहे. मागील वर्षी ४० लाख रुपये परतफेड करण्यात आले, तर यावर्षी ६० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.न.प.च्या शाळांसाठी ५१ लाखांचे नियोजननगर परिषदेमार्फत प्राथमिक शाळा चालविल्या जातात. इंग्रजी माध्यमांच्या शाळांसोबत स्पर्धा करायची असेल तर नगर परिषदेच्या शाळा विकसित करणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन शाळांमध्ये सुविधा निर्माण करण्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. २०२०-२१ मध्ये १० लाख रुपयांचे डेस्क-बेंच, विद्यार्थ्यांसाठी १६ लाख रुपयांचे गणवेश व बुट तसेच इतर साहित्य खरेदी केले जाणार आहेत. क्रीडा महोत्सवासाठी १५ लाख रुपये, शाळा रंगरंगोटीसाठी १० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.महिला व बालकल्याणसाठी ११ लाखांची तरतूददारिद्र्य निर्मूलनासाठी नगर परिषदेने ११ लाख ७६ हजार रुपयांची तरतूद केली आहे. त्यापैकी आस्थापनेवर ७ लाख ७० हजार तर महिला व बाल कल्याणासाठी ४ लाख ६ हजार रुपयांची तरतूद केली आहे. रोगप्रतिबंधक लस खरेदीसाठी ३० हजार रुपये, फवारणीसाठी ३० हजार रुपये अशी एकूण ६० हजार रुपयांची तरतूद केली आहे. या निधीतून महिला व बालकल्याणसाठी विविध योजना राबविल्या जातील.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाBudgetअर्थसंकल्प