शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

१८४ नागरिकांना चष्मे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 05:00 IST

ज्येष्ठ नागरिक नारायण वाकडे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सांजमाडिया संस्थेचे अध्यक्ष रूपलाल गोंगले यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर १८४ रूग्णांना मोफत चष्मे व औषधी वितरित करण्यात आली. यावेळी सेवाग्राम येथील नेत्रतज्ज्ञ डॉ. अजय शुक्ला व डॉ. कार्लेकर यांनी डोळ्यांची निगा कशी राखावी तसेच डोळ्यांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देचामोर्शी येथे कार्यक्रम : सांजमाडिया संस्थेचा पुढाकार; मोफत औषधी वितरित

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : छत्रपती शिवाजी महाराज जयंती सप्ताहाचे औचित्य साधून जि. प. केंद्र शाळा चामोर्शी येथे शनिवारी कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात १८४ नेत्र रूग्णांना मोफत चष्मे व औषधीचे वितरण करण्यात आले.ज्येष्ठ नागरिक नारायण वाकडे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सांजमाडिया संस्थेचे अध्यक्ष रूपलाल गोंगले यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर १८४ रूग्णांना मोफत चष्मे व औषधी वितरित करण्यात आली. यावेळी सेवाग्राम येथील नेत्रतज्ज्ञ डॉ. अजय शुक्ला व डॉ. कार्लेकर यांनी डोळ्यांची निगा कशी राखावी तसेच डोळ्यांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन केले.विशेष म्हणजे, सांजमाडिया संस्था बिनागुंडा, लॉयन्स आय सेंटर सेवाग्राम वर्धा व लॉयन्स क्लब चंद्रपूर, महावीर इंटरनॅशनल संस्था चंद्रपूर, सोलर ग्रुप आॅफ इंडस्ट्रिज नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने २ ते १० फेब्रुवारीपर्यंत सेवाग्राम येथे चामोर्शी तालुक्यातील २४१ नेत्र रूग्णांवर मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर या शिबिरातून शस्त्रक्रिया झाल्यानंतर आलेल्या १८४ नेत्र रूग्णांची पुन्हा तपासणी करण्यात आली. यापैकी १८४ रूग्णांना मोफत चष्मे व औषधीचे वितरण करण्यात आले.चामोर्शी तालुक्यातील नेत्र रूग्णांची सेवा करण्याची संधी मिळाल्याने आत्मिक समाधान लाभल्याचे मत सांजमाडिया संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रूपलाल गोंगले यांनी चष्मे वितरण कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैभव सोनटक्के, विलास मेश्राम, सुरेश दुर्गे, नीता बारसागडे, मुख्याध्यापक विशाल दुधबळे यांनी सहकार्य केले.