शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
राजीनामा-शासन भिकारी, माणिकराव कोकाटेंच्या विधानावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले...
3
Video : चाकू काढला आणि ३२ हजारांचा लेहेंगा फाडला, दुकानदाराला म्हणाला, 'तुलाही असाच फाडेन'; कल्याणमधील व्हिडीओ व्हायरल
4
IND vs ENG: शुभमन गिल की सचिन तेंडुलकर? ३५ कसोटीनंतर कोण वरचढ? पाहा आकडे!
5
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
6
स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न पाहताय? 'सेल्फ-कन्स्ट्रक्शन होम लोन' कसं मिळवायचं, व्याजासह प्रक्रिया जाणून घ्या
7
Deep Amavasya 2025: आषाढ अमावास्येला दिव्यांची आवस म्हणतात, गटारी नाही; धर्मशास्त्र सांगते...
8
ट्रेन सुटली तरीही वाया जात नाही तुमचं तिकीट...! रेल्वेचा हा नियम तुम्हाला कदाचितच माहित असेल
9
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मुक्ताईनगर बंद
10
Viral Video: महाकाय अजगराला जांभई देताना कधी पाहिलंय का? दृश्य पाहून तुम्हालाही भरेल धडकी...
11
जावेसोबतच्या भांडणाचा राग अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचं षडयंत्र; पिठात विष मिसळलं, पण...
12
भारतीय कुटुंबांची 'बचत' सवय मोडली? ५० वर्षांतील सर्वात कमी बचत दर, गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले असं असेल तर..
13
बिहारमधील नेत्यासाठी जगदीप धनखड यांचा राजीनामा, काँग्रेस नेत्याचा नवा दावा
14
IPO मध्ये १ लाख गुंतवले, आता त्याचे राहिले फक्त ₹३,२००; कसं मोठ्या आयपीओंनी बनवलं गुंतवणुकदारांना कंगाल
15
"पंडित नेहरुंनी मांडीवर बसवलं, गुलाबाचं फूल दिलं", सचिन पिळगावकरांचा हा किस्सा माहितीये का?
16
Rajasthan Accident: देवदर्शनाहून परतताना भीषण अपघात; पाच ठार, चार जण जखमी!
17
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
18
“यालाही हनी ट्रॅप म्हणायचे का?”; फोटोला फोटोने उत्तर, ठाकरे गटाच्या आरोपावर भाजपाचा पलटवार
19
सोने, चांदी, बिटकॉइन स्वस्त होणार? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा दावा; वॉरेन बफेही 'त्या' क्षणाची वाट पाहतायेत?
20
एअर इंडियाच्या बोईंग जेटच्या फ्युएल कंट्रोल स्विचची तपासणी पूर्ण; समोर आली महत्त्वाची माहिती

१० इच्छुकांनी भरले १८ नामांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 22:51 IST

गडचिरोली-चिमूर या अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव लोकसभा मतदार संघात नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ६ उमेदवारांनी अर्ज भरले. त्यामुळे अर्ज भरणाऱ्यांची एकूण संख्या १० झाली आहे. त्यांचे एकूण १८ अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आले आहेत. त्या अर्जांची मंगळवारी छाननी होऊन वैध अर्ज काढले जाणार आहेत.

ठळक मुद्देआज अर्जांची छाननी : शक्तीप्रदर्शन, मंत्र्यांसह सहा आमदारांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली-चिमूर या अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव लोकसभा मतदार संघात नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ६ उमेदवारांनी अर्ज भरले. त्यामुळे अर्ज भरणाऱ्यांची एकूण संख्या १० झाली आहे. त्यांचे एकूण १८ अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आले आहेत. त्या अर्जांची मंगळवारी छाननी होऊन वैध अर्ज काढले जाणार आहेत.नामांकन दाखल करणाºया उमेदवारांमध्ये एकूण उमेदवारांमध्ये डॉ.नामदेव उसेंडी (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), अशोक नेते (भारतीय जनता पार्टी), देवराव नन्नावरे (आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडिया), रमेशकुमार गजबे (वंचित बहुजन आघाडी), नामदेव किरसान (अपक्ष), दामोधर नेवारे (अपक्ष), सुवर्णा वरखडे (गोंडवाना गणतंत्र पार्टी), दिवाकर पेंदाम (बहुजन मुक्ती पार्टी), हरिचंद्र मंगाम व पवन रामचंद्र मगरे (बहुजन समाज पार्टी) यांचा समावेश आहे. मंगाम व मगरे यांनी बसपाकडून नामांकन दाखल केले असले तरी दोघांपैकी कोण अधिकृत हे रात्रीपर्यंत निवडणूक विभागाकडून स्पष्ट करण्यात आले नव्हते. दरम्यान लोकमतने बसपा पदाधिकाऱ्यांशी संपर्क केला असता मंगाम हेच अधिकृत उमेदवार असून त्यांच्या नावाचा एबी फॉर्म निवडणूक विभागाला दिला असल्याचे सांगण्यात आले.शुक्रवार दि.२२ ला काँग्रेसचे डॉ.नामदेव उसेंडी यांनी आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांना सोबत घेऊन शक्तीप्रदर्शन करत नामांकन दाखल केले होते. त्याच दिवशी भाजपचे उमेदवार व विद्यमान खासदार अशोक नेते यांनीही नामांकन भरले पण त्यावेळी कोणताही गाजावाजा केला नव्हता. त्यामुळे सोमवारी पुन्हा नव्याने नामांकन भरताना त्यांनी खुल्या जीपवरून अभिवादन करत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. यावेळी लोकसभा क्षेत्रातील आ.डॉ. देवराव होळी, आ.कृष्णा गजबे, आ.संजय पुराम, आ.बंटी भांगडिया तथा आ.रामदास आंबटकर, प्रमोद पिपरे, तसेच शिवसेनेच्या वतीने विजय श्रुंगारपवार व अरविंद कात्रटवार उपस्थित होते. काही वेळानंतर पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम आणि त्यानंतर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही गडचिरोली गाठून भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांना प्रवेशबंदी!निवडणुकीच्या काळातील दैनंदिन घडामोडींची माहिती घेण्यासाठी नेहमीप्रमाणे सोमवारी (दि.२५) पत्रकार जिल्हाधिकारी कार्यालयात गेले असता त्यांना प्रवेशद्वारावरच अडवण्यात आले. नामांकन प्रक्रिया सुरू असल्यामुळे पत्रकारांना प्रवेश न देण्याचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती तेथे कर्तव्यावर असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाने दिली. विशेष म्हणजे ही प्रवेशबंदी सायंकाळपर्यंत कायम होती. कोणतेही कारण न देता किंवा विश्वासात न घेता लादलेल्या या प्रवेशबंदीचा गडचिरोली प्रेस क्लबने निषेध व्यक्त केला.निवडणुकीसाठी उमेदवारांनी नामांकन दाखल करणे ही बाब गोपनिय नाही. असे असताना तिथे पत्रकारांना प्रवेश का नाकारण्यात आला? याबाबत वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला, परंतू कोणाकडेही त्याचे उत्तर नव्हते. जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश आहे एवढेच त्यांना माहीत होते. जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनाही भ्रमणध्वनीवर संपर्क केला, मात्र त्यांनी कॉलच स्वीकारला नाही. इतर कोणत्याही लोकसभा मतदार संघांत अशा पद्धतीने पत्रकारांना प्रवेशबंदी केली नसताना गडचिरोलीत घडलेला हा प्रकार लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला अपमान असल्याची भावना तमाम पत्रकारांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात इतरही विभागांचे कार्यालय आहे. पण प्रवेशबंदीमुळे कोणत्याच कार्यालयात पत्रकारांना जाणे शक्य होत नव्हते.मीडिया सेल गायबनिवडणुकीच्या काळात जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसार माध्यमांसाठी स्वतंत्र मीडिया सेल कार्यरत राहणार असल्याचे जिल्हाधिकाºयांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. पण तो सेल गायब आहे. प्रसार माध्यमांना कोणत्याही बातम्या पुरविल्या जात नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे निवडणूक काळात यापूर्वीच्या निवडणुकांचा गोषवारा देणारी पूर्वपिठीका काढली जाते. पण यावेळी अशी कोणतीही माहिती प्रकाशित करण्यात आली नाही.