गडचिरोली विधानसभा मतदारसंघात एकूण २ लाख ८९ हजार ६१६ मतदार आहेत. त्यात शंभरी पार केलेले ६३ मतदार आहेत. आरमोरी मतदारसंघात २ लाख ५६ हजार ५०७ मतदार आहेत. त्यात शंभरी पार केलेले ५९ आहेत. याशिवाय अहेरी मतदारसंघात एकूण २ लाख ३९ हजार ५६ मतदार आहेत. त्यात वयाची १०० वर्षे पूर्ण केलेले ५१ आहेत.
विधानसभानिहाय शंभरीपार मतदार
गडचिरोली - ६३
आरमोरी - ५९
अहेरी - ५१
७,८५,१७९
जिल्ह्यातील मतदार
३,९७,६२४
पुरुष मतदार
३,८७,५५३
महिला मतदार
आरमोरीत सर्वाधिक नवमतदार
- वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या युवक-युवतींना मतदानाचा हक्क मिळतो. १५ जानेवारीपूर्वी अशा १८ हजार १३२ नवमतदारांची भर पडली आहे. त्यात सर्वाधिक ७१५६ मतदारांची भर आरमोरी विधानसभा क्षेत्रात पडली आहे. गडचिरोली मतदारसंघात ६१२७ तर अहेरी मतदारसंघात ४८४९ नवीन मतदार समाविष्ट झाले आहेत.
- तीनही मतदारसंघ मिळून सर्वाधिक म्हणजे १ लाख ८० हजार ६४७ मतदार ३० ते ३९ वयोगटातील आहेत हे विशेष. त्यात गडचिरोली मतदारसंघात ६६,३०१, आरमोरीत ५८,१२७ तर अहेरी मतदारसंघातील ५६,२१९ मतदारांचा समावेश आहे.