लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोनाचा कहर जिल्ह्यात अजूनही कमी झालेला नाही. बुधवारी (दि.१२) आणखी २६ जण नव्याने बाधित झाले. मात्र याचवेळी १७ लोकांनी कोरोनाला हारवल्याने त्यांना सुटी देण्यात आली. आतापर्यंत ६११ जणांनी यशस्वीरीत्या कोरोनावर मात केली आहे.नवीन रुग्णांमुळे जिल्ह्यातील अॅक्टिव्ह कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा वाढून तो १६५ झाला आहे. आतापर्यंतच्या एकूण कोरोनाधितांची संख्या ७७७ झाली आहे. नव्याने बाधित रुग्णांमध्ये १७ सीआरपीएफ जवानांसह ९ नागरिकांचा समावेश आहे.आतापर्यंत बाहेरून आलेल्या आणि संस्थात्मक विलगिकरणात असलेल्याच लोकांचा अहवाल पॉझिटिव्ह येत होता. मात्र आता विलगिकरणात नसलेल्या नागरिकांमध्येही पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असल्यामुळे अधिक दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे.कोरोनामुक्त झाल्याने सुटी दिलेल्या १७ लोकांमध्ये गडचिरोली येथील ७, आरमोरीतील ७, चामोर्शी तालुक्यातील ३ जणांचा समावेश आहे. गडचिरोलीतील ७ जणांमध्ये २ आरोग्य कर्मचारी, २ जिल्हा पोलीस आणि ३ इतर नागरिकांचा समावेश आहे.आरमोरी तालुक्यातील कोरोनामुक्त व्यक्तींमध्ये ७ एसआरपीएफ जवान आहेत. तसेच चामोर्शी तालुक्यातील जयरामनगर येथील ३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.गडचिरोलीतील डॉक्टरला बाधानवीन २६ कोरोनाबाधितांमध्ये धानोरा येथील १६ सीआरपीएफ आहेत. तसेच अहेरी येथील ५ जणांमध्ये एक सीआरपीएफ जवान आणि तेलंगणावरून प्रवास करून आलेल्या ४ इतर नागरिकांचा समावेश आहे. तसेच गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रूग्णालयातील एक डॉक्टर व मंगळवारी पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णाचे वडील असे दोघे कोरोनाबाधित आढळून आले आहेत.कोरची तालुक्यातील दोन रुग्णांमध्ये मंगळवारी पॉझिटिव्ह आढळलेल्या ४ वर्षीय बालकाच्या वडीलाचा समावेश आहे. तसेच त्यांच्या संपर्कातील एक पोलीस जवान बाधित आढळला आहे. भामरागड तालुक्यात मागील आठवडयात एक फळ विक्र ेता पॉझिटिव्ह आढळला होता, त्याच्या संपर्कातील एकजण बुधवारी बाधित आढळून आला आहे.
आणखी १७ लोकांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 05:00 IST
आतापर्यंत बाहेरून आलेल्या आणि संस्थात्मक विलगिकरणात असलेल्याच लोकांचा अहवाल पॉझिटिव्ह येत होता. मात्र आता विलगिकरणात नसलेल्या नागरिकांमध्येही पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असल्यामुळे अधिक दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोनामुक्त झाल्याने सुटी दिलेल्या १७ लोकांमध्ये गडचिरोली येथील ७, आरमोरीतील ७, चामोर्शी तालुक्यातील ३ जणांचा समावेश आहे.
आणखी १७ लोकांची कोरोनावर मात
ठळक मुद्देनव्याने २६ बाधितांची भर : सीआरपीएफचे १७ जवान झाले पॉझिटीव्ह