शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

१७ वैद्यकीय अधिकारी पदोन्नतीच्या प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 17:12 IST

यादी प्रसिद्ध : अंमलबजावणी रखडली

लोकमत न्यूज नेटवर्क घोट : गेल्या २३ वर्षांपासून जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी गट 'ब' संवर्ग हे पदोन्नतीच्या प्रतीक्षेत होते. यासाठी राजपत्रित वैद्यकीय अधिकारी महासंघाने शासन दरबारी वारंवार पाठपुरावा केला. संघटनेच्या लढ्यामुळे शासनाने राज्यातील ७१० वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीची यादी जानेवारी २०२४ मध्ये प्रसिद्ध केली. मात्र सहा महिने झाले तरी या यादीची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात आली नसल्याने जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत.

वैद्यकीय अधिकारी गट 'ब' हे शासकीय सेवेत येऊन १७ वर्षाचा कालावधी लोटला आहे. आजही त्यांना अतिरिक्त पदभाराचे काम करावे लागत आहे. प्रशासकीय बाबीचे कारण सांगून याकडे दुर्लक्ष होत आहे. वैद्यकीय अधिकारी व गट संवर्गाच्या पदोन्नतीसंदर्भात आरोग्य विभागाने आतापर्यंत तीन स्मरणपत्रे दिली आहेत. मात्र शासनाकडून कोणतीच हालचाल होत नाही. शासन जाणूनबुजून प्रशासकीय बाबी पुढे करत वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप संघटनेकडून केला जात आहे. मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांनी यात लक्ष घालून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी होत आहे. संघटनेच्या शिष्टमंडळासोबत उच्चस्तरीय बैठक घेऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी आहे.

जिल्हा तांत्रिक सेवा आणि राज्यसेवा संवर्गातील गट 'ब' वैद्यकीय अधिकारी यांना ज्याप्रमाणे गट 'अ'मध्ये पदोन्नती देण्यात आली, त्याच न्याय तत्त्वानुसार २०१९ साली सेवासमावेशन झालेल्या वैद्यकीय अधिकारी गट 'ब' यांना गट 'अ'मध्ये पदोन्नती देण्याची प्रक्रिया लवकर करावी, विभागीय पदोन्नती देण्यात येते. परंतु, आरोग्य विभागातील गट 'ब' वैद्यकीय अधिकारी संवर्ग कायमच पदोन्नतीच्या लाभापासून उपेक्षित राहिला आहे. संघटनेकडून वारंवार मागणी करून व नियमित पाठपुरावा करूनही पदोन्नतीचा लाभ देण्यात आलेला नाही.- डॉ. उमाकांत मेश्राम, राज्य प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य वैद्यकीय अधिकारी 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली