शहरं
Join us  
Trending Stories
1
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
2
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
3
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट
4
इराण-इस्रायल युद्धबंदीनंतर सोन्याच्या किमतीत पहिल्यांदाच सर्वात मोठी वाढ! चांदीही चमकली!
5
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
6
ENG vs IND : १२३ वर्षांत जे घडलं नाही ते करून दाखवण्याचं चॅलेंज; इथं पाहा टीम इंडियाचा रेकॉर्ड
7
वनप्लस पुन्हा एकदा डबल धमाका करणार; एकात वनप्लस १३ चा कॅमेरा? कोणते फोन येतायत...
8
हुंड्यासाठी पती झाला हैवान! दागिने, AC साठी टॉर्चर; लग्नानंतर ३ दिवसांनी नववधूने संपवलं जीवन
9
पतीशी भांडण करून दुसऱ्या खोलीत झोपली पत्नी; मध्यरात्री पतीला आली जाग, खोलीत डोकावून पाहताच... 
10
आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना भोजन मोफत 
11
'मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी', विधानसभेच्या कामकाजावर विरोधकांचा दिवसभरासाठी बहिष्कार
12
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताय? फक्त परतावा नका पाहू, 'या' १० गोष्टी तपासाच! अन्यथा पैसे जातील पाण्यात
13
५०० वर्षांनी गुरु-शनिचा पॉवरफूल योग: ९ राशींचे कल्याण, अपार लाभ; भरघोस भरभराट, बक्कळ पैसा!
14
'त्या' रात्री काय झालं? पतीला कसं मारलं? बॉयफ्रेंडसोबत पकडल्या गेलेल्या ९ मुलांच्या आईने 'असा' केला गुन्हा कबूल! 
15
कॉलर पकडली, फरफटत नेलं, बेदम मारलं; भाजपा नेत्याच्या समर्थकांची आयुक्तांना मारहाण
16
'आभाळमाया'तील चिंगीला असा मिळाला 'बाजीराव मस्तानी', सेटवर संजय भन्साळी चिडले तेव्हा...
17
फक्त एक फोन लीक झाला अन् 'या' देशाच्या पंतप्रधानांना पदावरून हटवलं; नेमकं काय घडलं?
18
कर्नाटक काँग्रेसमध्ये हालचालींना वेग! 'डीके शिवकुमार यांच्यासोबत १०० आमदार'; नेत्याच्या दाव्यामुळे हायकमांड बंगळुरुमध्ये पोहोचले
19
Shefali Jariwala : "परागला चौकशीला जावं लागेल", शेफालीच्या मैत्रिणीनं पोस्टमार्टम रिपोर्टबाबत केले खुलासे, म्हणाली - "काहीतरी गडबड.."
20
"केंद्रात सत्ता येताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालणार’’, काँग्रेसच्या बड्या नेत्याने दिले स्पष्ट संकेत 

१७ कोटी ३५ लाखांवर शिष्यवृत्तीची खैरात

By admin | Updated: February 7, 2015 00:48 IST

गडचिरोली जिल्ह्यात सत्र २०१३-१४ मध्ये समाज कल्याण विभागाकडे ४६४७ विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली.

चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात सत्र २०१३-१४ मध्ये समाज कल्याण विभागाकडे ४६४७ विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यात २५६३, गडचिरोली जिल्ह्यातील २०८४ विद्यार्थ्यांचे नामांकन समाज कल्याण विभागाकडे करण्यात आले होते. तर आदिवासी विकास विभागाकडे चंद्रपूर जिल्ह्यात १०५२ व गडचिरोली जिल्ह्यात ११३१ विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली होती. चंद्रपूर जिल्ह्यात समाज कल्याण व आदिवासी विकास विभागाकडे मिळून ३६१५ तर गडचिरोली जिल्ह्यात ३२१५ विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली. दोन्ही जिल्ह्यात आदिवासी विकास व समाज कल्याण विभाग मिळून ६८३० विद्यार्थ्यांची नोंदणी झाली. त्यापैकी ५०७५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप दोनच जिल्ह्यात करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यात समाज कल्याण विभागाने २४०८, गडचिरोली जिल्ह्यात १६३३ तर आदिवासी विकास विभागाने चंद्रपूर जिल्ह्यात १०१ व गडचिरोली जिल्ह्यात ९३३ अशा एकूण १०३४ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप केले. दोन्ही विभागाने मिळून चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात ५०७५ विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. ३४ हजार २०५ रूपये प्रमाणे समाज कल्याण विभागाने १३ कोटी ८२ लाख २२ हजार ४०५ तर आदिवासी विकास विभागाने ३ कोटी ५३ लाख ६७ हजार ९७० रूपयाच्या शिष्यवृत्तीचे वाटप चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात केले. या शिष्यवृत्ती वाटपात आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी व समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त यांची अत्यंत मोठी भूमिका राहिली आहे. त्यामुळे त्यांचीही चौकशी होणे आवश्यक आहे. एका सहायक आयुक्तांनी आपल्या कार्यकाळात १३ कोटी ८२ लाख २२ हजार ४०५ रूपयांचे वाटप केलेले आहे, हे विशेष. दोन जिल्ह्यात वाटप झालेल्या शिष्यवृत्तीच्या रक्कमेत प्रचंड गौडबंगाल झाल्याचा प्रकरण आदिवासी विकास विभागात उजेडात आला आहे. मात्र या प्रकरणात समाज कल्याण विभागाचे, दोन जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प कार्यालयाचे अधिकारीही सहभागी असल्याने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी सध्या मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. शासनाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष आहे.