शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

१६१ गावांत ‘एक गाव-एक गणपती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 11:14 PM

गावागावात शांतता व सुव्यवस्था राहून सामाजिक सलोखा टिकावा तसेच भांडण, तंट्यांचा मागमूसही नसावा,.....

ठळक मुद्देउद्यापासून उत्सवाला सुरुवात : जिल्हाभरात ५४५ सार्वजनिक गणपतींची होणार स्थापना

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गावागावात शांतता व सुव्यवस्था राहून सामाजिक सलोखा टिकावा तसेच भांडण, तंट्यांचा मागमूसही नसावा, शिवाय गावात एकतेची भावना वृंद्धिगत व्हावी या उदात्त हेतूने गेल्या अनेक वर्षांपासून ‘एक गाव-एक गणपती’ची संकल्पना गडचिरोली जिल्ह्यात राबविली जात आहे. यंदा जिल्ह्याच्या ९ पोलीस विभागाच्या हद्दीतील तब्बल १६१ गावांमध्ये ‘एक गाव-एक गणपती’ची संकल्पना साकारण्यात येणार आहे. त्यादृष्टीने संबंधित गणेश मंडळांनी पोलीस विभागाकडे रितसर नोंदणी केली आहे.जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात यंदा ५४५ सार्वजनिक मंडळातर्फे श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. मंडळांच्या पदाधिकाºयांसह कार्यकर्त्यांनी यंदाचा गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. २५ आॅगस्ट रोजी शुक्रवारपासून यंदा गणेशोत्सवास प्रारंभ होत आहे. त्यादृष्टीने शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या हेतूने प्रत्येक पोलीस ठाणेस्तरावर गणेश मंडळांच्या पदाधिकाºयांची शांतता सभा घेतली जात आहे. गतवर्षीही गडचिरोली जिल्ह्यात १०० वर गावात ‘एक गाव, एक गणपती’ची संकल्पना साकारण्यात आली होती. सार्वजनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी गणेशोत्सवाच्या तयारीला लागले असून गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना होणाºया ठिकाणची जागा स्वच्छ करण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी भव्यदिव्य मंच तयार केला जात आहे. याशिवाय विद्युत रोषणाई व वाद्यांचे नियोजन मंडळातर्फे करण्यात आले आहे. यावर्षी जिल्ह्यातील काही गणेश मंडळ रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर आदी सामाजिक उपक्रमासह प्रबोधनात्मक कार्यक्रमही आयोजित करणार आहेत. सार्वजनिक गणेश मंडळाचा मनोरंजनात्मक कार्यक्रमावरही भर राहणार आहे. त्यादृष्टीने मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते गणेशोत्सवाच्या तयारीला जोमात भिडले आहेत.यावर्षी गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक गडचिरोेली पोलीस उपविभागाच्या हद्दीतील ५९ गावांमध्ये ‘एक गाव - एक गणपती’ची संकल्पना राबविली जाणार आहे. या संकल्पनेसाठी संबंधित गावांनी काही दिवसांपूर्वीच बैठक घेतली. या बैठकीत बहुमताने निर्णय झाल्यावर रितसर पोलीस विभागाकडे नोंदणी करण्यात आली.ही संकल्पना राबविणारे अनेक गणेश मंडळ सामाजिक उपक्रम राबविणार आहेत.महावितरणची वीज चोरट्यांवर करडी नजरसार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी चोरीची वीज वापरू नये, यासाठी महावितरणच्या वतीने उत्सवकाळात मंडळांना सवलतीच्या दरात वीज जोडणी दिली जाते. उत्सव मंडळांना प्रतीजोडणी प्रतीमाह ३३० रूपये स्थिर आकार तर प्रती युनिट ४३१ रूपये अस्थिर आकार आकारण्यात येणार आहे. वीज जोडणीसाठी उत्सव मंडळांना सदर कालावधीसाठी १ हजार रूपये सुरक्षा रक्कम भरावी लागणार आहे. या उत्सव मंडळांना प्राधान्याने वीज जोडणी देण्याबाबत महावितरणच्या सर्व क्षेत्रिय अधिकाºयांना महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकाने निर्देश दिले आहेत. सार्वजनिक मंडळांनी उत्सव काळासाठी महावितरणकडून रितसर वीज जोडणी घ्यावी, याकरिता जनजागृती सुरू आहे. उत्सव काळात महावितरणचे अधिकारी व कर्मचाºयांची वीज पुरवठा व चोरीवर करडी नजर राहणार आहे. तपासणीकरिता महावितरणचे पथकही गठित करण्यात आले आहे.तगडा पोलीस बंदोबस्त राहणारशुक्रवारपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार असून प्रतिष्ठापनेपासून तर विसर्जन मिरवणुकीच्या दिवसापर्यंत जिल्ह्याच्या सर्व पोलीस ठाण्यातर्फे सार्वजनिक गणेश उत्सवाच्या ठिकाणी तगडा पोेलीस बंदोबस्त राहणार आहे. पोलिसांच्या दिमतीस शेकडो गृहरक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे. पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षकांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचारी गणेशोत्सवादरम्यान सुरक्षा व्यवस्था सांभाळणार आहेत.