शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला
3
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
4
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
5
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
6
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
7
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
8
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
9
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
10
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
11
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
12
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
14
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
15
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
16
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
17
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
18
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
19
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
20
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...

१६ हजार मेट्रिक टन खत शिल्लक

By admin | Updated: September 3, 2016 01:25 IST

धान गर्भात येताच शेतकरी वर्गाकडून युरीया तसेच इतर मिश्र खतांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते.

कृषी विभागाचे नियोजन : धान पिकासाठी युरियासह इतर खतांची मागणी वाढणारगडचिरोली : धान गर्भात येताच शेतकरी वर्गाकडून युरीया तसेच इतर मिश्र खतांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. दरवर्षीप्रमाणे खताचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने अगोदरच तयारी करून ठेवली असून युरीयासह १५ हजार मेट्रिक ९९२ मेट्रिक टन खताचा साठा उपलब्ध आहे.जुलै महिन्यात धानपिकाच्या रोवणीची कामे पूर्ण होतात. रोवणीच्या कामादरम्यान खत टाकले जाते. त्यानंतर धान गर्भात आल्यानंतर खत देणे आवश्यक आहे. त्यामुळे आॅगस्ट सप्टेंबर महिन्यात युरीयासह इतर मिश्रखतांची मागणी वाढते. विशेष करून युरीया खत टाकण्याकडे शेतकऱ्यांचा कल असल्याचे दिसून येते. या कालावधीत शेतकऱ्यांकडून प्रचंड मागणी वाढत असल्याने युरिया खताचा तुटवडा निर्माण होतो. २०१६-१७ साठी २४ हजार २०० मेट्रिक टन युरिया खताचे आवंटन मंजूर करण्यात आले. त्यापैकी १४ हजार ९८८ मेट्रिक टन खत उपलब्ध झाले. ११ हजार ६५० मेट्रिक टन खताची प्रत्यक्ष विक्री झाली व मागील हंगामातील १ हजार ३४३ मेट्रिक टन खत शिल्लक होते. त्यामुळे शिल्लकी साठा आता ४ हजार ६८२ मेट्रिक टनवर पोहोचला आहे. यावर्षी अगदी सुरूवातीलाच दमदार पाऊस झाल्याने तलाव तुडूंब भरले व त्यानंतरही अधूनमधून पाऊस येत आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत धानपीक चांगले असल्याने शेतकरी आनंदी आहे. थोडे जास्त खत टाकल्यास उत्पादनात वाढ होईल. या अपेक्षेने शेतकरी वर्ग या वर्षी मागील वर्षीच्या तुलनेत खताची जास्त खरेदी करणार आहे. ही बाब लक्षात घेऊन आणखी खत मागविले आहे. त्यामुळे किमान यावर्षी खताचा तुटवडा निर्माण होणार नाही, अशी अपेक्षा केली जात आहे. (नगर प्रतिनिधी)एक हजार मेट्रिक टन युरिया खताची पडणार भरसद्य:स्थितीत जिल्हाभरात युरिया खताचा ४ हजार ६८२ मेट्रिक टन साठा शिल्लक आहे. तरीही पुढील १५ दिवसात युरिया खताची मागणी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन कृषी विभागाने एक हजार मेट्रिक टन युरिया खताची मागणी केली आहे. सदर खत पुढील आठवड्यात उपलब्ध होण्याची शक्यता कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. हा खत उपलब्ध झाल्यास युरियाचा जिल्हाभरातील साठा साडेपाच हजार मेट्रिक टनावर पोहोचणार आहे. योग्य नियोजनाची गरजयुरिया खताची मागणी एकावेळेस वाढत असल्याचा दरवर्षीचा अनुभव आहे. याचा फायदा कृषी केंद्र चालक उचलतात. खताचा कृत्रिम निर्माण करून शेतकऱ्यांकडून अधिकची रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न कृषी केंद्र चालकांकडून केला जातो. खत उपलब्ध असतानाही जाणूनबुजून शेतकऱ्यांची लूट होत असल्याचा अनुभव आहे. त्यामुळे कृषी विभागाने योग्य नियोजन करून प्रत्येक कृषी केंद्र चालकाकडे किती खत साठा उपलब्ध आहे, याची अद्यावत माहिती मागविणे गरजेचे आहे व संबंधित कृषी केंद्र चालकांवर नजर ठेवणे गरजेचे आहे.