गडचिरोली : राज्याच्या पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्रालयाने गडचिरोली जिल्ह्यातील १६ पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या अन्य जिल्ह्यात बदल्या केल्या आहेत.कुरखेडा तालुक्यातील येंगलखेडा येथील श्रेणी एकच्या दवाखान्यातील पशुधन विकास अधिकारी डॉ.दामोदर कोकरे यांचे सांगली जिल्ह्यातील कासेगाव येथे, देसाईगंज येथील डॉ. एस. पी. गायकवाड यांचे बीड जिल्ह्यातील सुलेमान देवळा येथे, तर येंगलखेडा येथील डॉ.रामकृष्ण देवकुळे यांचे सांगली जिल्ह्यातील ऐतवडे येथे स्थानांतरण करण्यात आले आहे. चामोर्शी तालुक्यातील भाडभिडी येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. गजानन मोकादम यांची वर्धा जिल्ह्यातील पारडी, चातगावचे डॉ. शरदकुमार बचे यांची अमरावती जिल्ह्यातील पथ्रोट, तर सिरोंचा तालुक्यातील सोमनपल्ली येथील डॉ. अजय भिंगे यांची अकोला जिल्ह्यातील गाझीपूर येथे बदली करण्यात आली आहे. पेरमिलीचे डॉ. ए. ए. दगडे यांना नांदेड जिल्ह्यातील कुरुळा येथे, कोरची तालुक्यातील बेलगाव (घाट) येथील डॉ.चाऊस हुुुुसेन सईन यांना परभणी जिल्हयातील मानवत येथे,तर सिरोंचा येथील दायमी सय्यद सुलेमान गुलाम रब्बानी यांना उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम येथे पाठविण्यात आले आहे. येवलीचे डॉ. मनिष लाडे यांचे ब्रम्हपुरी, गोडलवाहीचे डॉ. एस. एन.गोस्वामी यांचे नंदूरबार जिल्हयातील अमोनी येथे, तर मुरुमगावचे डॉ.एम.के.हेडाऊ यांचे भंडारा जिल्ह्यातील खापा येथे स्थानांतरण करण्यात आले आहे. कुनघाड्याचे डॉ.एकनाथ उसेंडी यांची बदली धानोरा येथील पशु चिकित्सालयात, तर सिरोंचा तालुक्यातील सिरकोंडा येथील डॉ. रवींद्रकुमार हातझाडे यांची भंडारा जिल्ह्यात बदली झाली आहे.
१६ पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या बदल्या
By admin | Updated: June 1, 2015 01:56 IST