शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

जिल्ह्यात १,५५७ सिकलसेल रूग्ण

By admin | Updated: December 10, 2014 22:57 IST

जिल्ह्यातील सिकलसेल रूग्णांच्या आकडेवारीवर नजर टाकली असता, जिल्ह्याला अद्यापही सिकलसेलचा विळखा कायम असल्याचे स्पष्ट होते. गडचिरोली जिल्ह्यात सद्यस्थितीत एसएस पॅटर्नचे एकूण

गडचिरोली : जिल्ह्यातील सिकलसेल रूग्णांच्या आकडेवारीवर नजर टाकली असता, जिल्ह्याला अद्यापही सिकलसेलचा विळखा कायम असल्याचे स्पष्ट होते. गडचिरोली जिल्ह्यात सद्यस्थितीत एसएस पॅटर्नचे एकूण १ हजार ५५७ सिकलसेल पीडित रूग्ण आहेत. तर एएस पॅटर्नचे १६ हजार ६४५ रूग्ण आहेत. आरोग्य विभागाच्यावतीने गडचिरोली तालुक्यातील एकूण १ लाख ४३ हजार २१८ लोकसंख्येपैकी १२ लाख १ हजार ३०१ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये एसएस पॅटर्नचे ३२९ व एएस पॅटर्नचे ३ हजार १६१ सिकलसेल रूग्ण आढळून आले. आरमोरी तालुक्यात एकूण १ लाख ८ हजार ३४० नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये एसएस पॅटर्नचे १४४ व एएस पॅटर्नचे १ हजार ५५८ सिकलसेल वाहक रूग्ण आढळून आले. देसाईगंज तालुक्यात १ लाख ८ हजार ८९८ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये एसएस पॅटर्नचे ७६ व एएस पॅटर्नचे ८८६ रूग्ण आढळून आले. कुरखेडा तालुक्यात १ लाख ११ हजार २६९ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये एसएस पॅटर्नचे २३६ पीडित रूग्ण आढळून आले. तर एएस पॅटर्नचे २ हजार ३४० वाहक रूग्ण आढळून आले. कोरची तालुक्यात १ लाख ९ हजार ४४७ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये एसएस पॅटर्नचे ४९ व एएस पॅटर्नचे ९१५ सिकलसेल रूग्ण आढळून आले.धानोरा तालुक्यात १ लाख १० हजार ८५७ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये एसएस पॅटर्नचे १२३ व एएस पॅटर्नचे ८७० रूग्ण आढळून आले. चामोर्शी तालुक्यात १ लाख १३ हजार २०५ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये एसएस पॅटर्नचे २१७ तर एएस पॅटर्नचे २ हजार ८८३ रूग्ण आढळून आले. मुलचेरा तालुक्यात १ लाख ६ हजार ७९९ नागरिकांची सिकलसेल तपासणी करण्यात आली. यामध्ये एसएस पॅटर्नचे ३० व एएस पॅटर्नचे २२१ सिकलसेल रूग्ण आढळून आले. अहेरी तालुक्यात १ लाख १३ हजार ५६६ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये एसएस पॅटर्नचे १८१ पीडित सिकलसेल रूग्ण आढळून आले. तर एएस पॅटर्नचे १ हजार ७१० वाहक रूग्ण आढळून आले. एटापल्ली तालुक्यात एकूण १ लाख ११ हजार ३२७ नागरिकांची सिकलसेल तपासणी करण्यात आली. यामध्ये एसएस पॅटर्नचे ५८ व एएस पॅटर्नचे ५६३ रूग्ण आढळून आले. भामरागड तालुक्यात १ लाख ४ हजार २०५ रूग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये एसएस पॅटर्नचे २७ व एएस पॅटर्नचे ४२६ रूग्ण आढळून आले. सिरोंचा तालुक्यात एकूण १ लाख ५ हजार ८२६ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये एसएस पॅटर्नचे ८२ व एएस पॅटर्नचे १ हजार ११२ रूग्ण आढळून आले. (स्थानिक प्रतिनिधी)