शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

महिनाभरात १३५ पाणी नमूने दूषित

By admin | Updated: August 18, 2016 01:28 IST

पावसाळ्यात जलजन्य व साथीच्या आजाराची लागण होऊ नये, यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वच्छ पाणी पिणे आवश्यक आहे.

आरोग्य धोक्यात : उपाययोजना करण्याकडे ग्रा.पं. चे दुर्लक्ष दिलीप दहेलकर  गडचिरोली पावसाळ्यात जलजन्य व साथीच्या आजाराची लागण होऊ नये, यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वच्छ पाणी पिणे आवश्यक आहे. पिण्याच्या पाण्याबाबत विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. शिवाय हातपंप, विहीर, नळ व इतर पाणी स्त्रोताच्या सभोवताल स्वच्छता राखणे गरजेचे आहे. यासंदर्भात आरोग्य विभाग, तालुका व जिल्हा प्रशासन वारंवार ग्रामपंचायत प्रशासनाला सूचना देऊन कार्यवाही करण्यास सांगत आहे. मात्र असे असतानाही ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे जुलै महिन्यात बाराही तालुक्यातील तब्बल १३५ पाणी नमूने तपासणीअंती दूषित आढळल्याने संबंधित गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामपंचायतस्तरावर कार्यरत असलेल्या जलसुरक्षकामार्फत गावातील पाणी नमूने तपासणीसाठी पंचायत समितीस्तरावरून जिल्हास्तरीय प्रयोगशाळेत पाठविले जातात. जुलै महिन्यात बाराही तालुक्यातील गावांमधून एकूण ३ हजार ९०५ पाणी नमूने जिल्हास्तरीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी आणण्यात आले. तपासणीअंती यापैकी १३५ पाणी नमूने दूषित आढळले असून याचे प्रमाण ३.४६ आहे. विशेष म्हणजे कुरखेडा तालुक्यातील सर्वाधिक ४६ व अहेरी तालुक्यातील ४३ पाणी नमूने दूषित आढळून आले आहे. या तालुक्यातील गावांमध्ये दूषित पाण्याचे प्रमाण अधिक असल्याचे जि. प. च्या आरोग्य विभागाच्या तपासणी अहवालात नमूद आहे. १ जानेवारी ते ३१ जुलै २०१६ या कालावधीत बाराही तालुक्याच्या गावांमधून एकूण १८ हजार १२ पाणी नमूने तपासणीसाठी जिल्हास्तरावर प्राप्त झाले. या पाणी नमून्याची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. यापैकी ८०४ पाणी नमूने दूषित आढळून आले असून यातील दूषित पाण्याचे प्रमाण ४.४६ आहे. सात महिन्यांच्या कालावधीत अहेरी तालुक्यातील सर्वाधिक २४०, चामोर्शी तालुक्यातील १३३, धानोरा तालुक्यातील ११३, कुरखेडा तालुक्यातील १२० व आरमोरी तालुक्याच्या गावातून १०१ पाणी नमूने दूषित आढळून आले आहे. गेल्या महिनाभरापासून गडचिरोली जिल्ह्यात वायरल फिव्हरचा प्रकोप सुरू असून गावागावात अनेक नागरिक तापाने फणफणत आहेत. दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, डायरिया, उलटी, अतिसार व इतर जलजन्य आजार मोठ्या प्रमाणात बळावतात. या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांचीही संख्या सध्या जिल्ह्यात मोठी आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने गावातील नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याबाबतच्या कार्यवाहीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अशा जलजन्य आजारातून नागरिकांना धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाणी गुणवत्ता कार्यशाळा आयोजित करून जिल्हाभर पाणी स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. मात्र अनेक ग्रामपंचायतीचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले आहे.