शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका, US न्यायालयानं टॅरिफ निर्णय ठरवला अवैध; काय म्हणाले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष?
2
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठा आंदोलक आक्रमक, रस्त्यावर ठिय्या आंदोलन, चक्का जाम
3
घुसखोरांना रोखण्यासाठी सीमेवर भिंत उभारणार का? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल
4
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
5
उत्तर भारतात ढगफुटी अन् भूस्खलनामुळे जलसंकट, उत्तराखंडमध्ये ढगफुटी तर हिमाचल प्रदेशात भूस्खलन; वैष्णोदेवी यात्रा स्थगित
6
VIDEO: फुल्ल ऑन राडा... नितीश राणाला भिडला दिग्वेश राठी, खेळाडू मध्ये पडले म्हणून नाहीतर...
7
भारतात हरित ऊर्जा, उत्पादन, तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम संधी, पंतप्रधान मोदींनी जपानच्या दौऱ्यात दिली माहिती
8
​बीडजवळ काळ बनून आला ट्रक; भीषण अपघातात ६ भाविकांचा जागीच मृत्यू
9
"तेव्हापासून आमच्यात…", 'सैराट' फेम आकाश ठोसरसोबतच्या रिलेशनशीपच्या चर्चेवर रिंकू राजगुरू स्पष्टच म्हणाली..
10
मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांचे खाण्यापिण्याचे हाल; गाडीतच स्वयंपाक, तिथेच जेवण
11
फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी अजित पवारांचे नेते सामील, लक्ष्मण हाके यांचा आरोप
12
पूजा कमी नौटंकीच जास्त! गणपतीसमोर पार्टीत नाचतात तसे नाचले, अर्जुन बिजलानीच्या घरातील व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले
13
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
14
महाराष्ट्रात ३४ हजार कोटींची गुंतवणूक; ३३ हजार रोजगार
15
आंदोलनादरम्यान, पोलिसांच्या मदतीला पाऊस आला धावून...
16
...आणि पोलिसांचा थेट जरांगे यांना व्हिडीओ कॉल!
17
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
18
मुसळधारेतही आंदोलकांचा उत्साह कायम, शहर, उपनगरात ठिकठिकाणी पावसाची जोरदार हजेरी; रात्री उशिरापर्यंत आझाद मैदानात गर्दी
19
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
20
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर

१३४ विद्यार्थी शोधले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2017 01:14 IST

राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण

जिल्हाभरात शाळाबाह्य विद्यार्थी शोधमोहीम गडचिरोली : राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात कार्यरत जि.प. शिक्षकांनी २८ ते ३० डिसेंबर २०१६ या तीन दिवसाच्या कालावधीत शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम राबविली. यामध्ये एकूण १३४ शाळाबाह्य विद्यार्थी आढळून आले. या सर्व विद्यार्थ्यांना नजीकच्या शाळांमध्ये दाखल करण्यात आले. ६ ते १४ वर्ष वयोगटातील एकही मूल शाळाबाह्य राहू नये, यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाने विशेष धोरण आखले आहे. या संदर्भात गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्याच्या शिक्षण विभागाला निर्देश देण्यात आले. त्यानुसार जि.प.च्या प्राथमिक शिक्षण विभागाने बाराही तालुकास्तरावर सूचना देऊन शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोध मोहीम राबविली. गडचिरोली तालुक्यात ८, आरमोरी तालुक्यात १४, देसाईगंज तालुक्यात ९, कुरखेडा तालुक्यात १८, कोरची तालुक्यात १०, धानोरा तालुक्यात १०, चामोर्शी तालुक्यात ५, मुलचेरा तालुक्यात ७, अहेरी तालुक्यात ११, एटापल्ली तालुक्यात ५, भामरागड तालुक्यात १९ व सिरोंचा तालुक्यात १८ असे एकूण १३४ विद्यार्थी शाळाबाह्य आढळून आलेत. या विद्यार्थ्यांना गावाच्या व शहराच्या परिसरातून शोधून काढण्यात आले. या शोध मोहिमेसाठी जि.प.चे प्राथमिक शिक्षणाधिकारी माणिक साखरे यांच्यासह बाराही तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख, शाळेचे मुख्याध्यापक व कार्यरत शिक्षकांनी सहकार्य केले. शाळाबाह्य विद्यार्थी शोध मोहिमेदरम्यान सर्व शिक्षकांना गाव शैक्षणिक पंजीका उपलब्ध करून देण्यात आले. या पंजीकेतील मुद्याच्या अनुषंगाने शिक्षकांनी गावात व शहरात फिरून शाळाबाह्य विद्यार्थी शोध मोहीम राबविली. ६ ते १४ वर्ष वयोगटातील मुलामुलींच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकार घेत असते. या वयोगटातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी राज्यस्तरावरून विविध कार्यक्रम कार्यान्वित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची पटावरील संख्या कायम राहावी, यासाठी शालेय पोषण आहार, गणवेश वितरण, पुस्तके व शैक्षणिक साहित्य पुरविणे, विविध स्पर्धांचे आयोजन व इतर उपक्रम राबविले जात आहेत. आता शिक्षक व विद्यार्थ्यांच्या दैनंदिन उपस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने बायोमेट्रीक व सेल्फीचा निर्णय घेतला आहे. शिक्षणाच्या प्रक्रियेत मुलींचे प्रमाण वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (स्थानिक प्रतिनिधी) १४ मुलांनी शाळाच पाहिली नाही ६ ते १४ वर्ष वयोगटातील शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम जिल्ह्यात राबविण्यात आली. यामध्ये मुळीच शाळेत न गेलेले १४ शाळाबाह्य विद्यार्थी आढळून आले. यामध्ये आरमोरी तालुक्यात ७, कुरखेडा तालुक्यात १, कोरची तालुक्यात ४, चामोर्शी १, अहेरी १ व अहेरी १ असे एकूण १४ मुलां, मुलींचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या १४ विद्यार्थ्यांनी यापूर्वी कधीही शाळा पाहिली नाही व ते शाळेतही गेले नाही. मध्येच शाळा सोडलेले १२० शाळाबाह्य विद्यार्थी शोधून काढण्यात आले व त्यांना नजीकच्या शाळेत दाखल करण्यात आले.