शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाचे १३३ कोटींचे नियोजन

By admin | Updated: May 15, 2014 02:09 IST

गडचिरोली /व चंद्रपूर जिल्ह्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या गोंडवाना विद्यापीठाचा २0१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये जवळपास १३२ कोटी ९६ लाख ५७ हजार रूपये एवढा उत्पन्न असून

दिगांबर जवादे■ गडचिरोलीगडचिरोली /व चंद्रपूर जिल्ह्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या गोंडवाना विद्यापीठाचा २0१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये जवळपास १३२ कोटी ९६ लाख ५७ हजार रूपये एवढा उत्पन्न असून याच वर्षी १३३ कोटी ७४ लाख रूपये खर्च राहणार आहे.गडचिरोली जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाशी संलग्नित होती. सिरोंचा, भामरागड यासारख्या तालुक्यातील महाविद्यालयांना नागपूरचे अंतर बरेच लांब पडत होते. त्यामुळे गडचिरोली येथे विद्यापीठाची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली. अखेर या मागणीला बर्‍याच प्रयत्नानंतर मूर्त रूप प्राप्त झाले. या विद्यापीठांअंतर्गत गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे २२७ महाविद्यालये असून ५७ अभ्यासक्रम चालविली जातात.विद्यापीठाचे दैनंदिन कामकाज व प्रशासन चालविण्याबरोबरच विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे, निकाल जाहीर करणे यासाठी कोट्यवधी रूपये खर्च होतात. मागील वर्षी विद्यापीठाला विविध मार्गातून १३0 कोटी ४३ लाख ६१ हजार रूपये प्राप्त झाले होते. त्यापैकी विविध बाबींवर १३0 कोटी ४४ लाख ७६ हजार रूपये खर्च झाले.यावर्षी विद्यापीठाला मुदतठेवी, दान निधी, अग्रीम व राखीव इमारतीच्या निधीवरील व्याज म्हणून ६५ लाख रूपये प्राप्त होणार आहेत. शिक्षक व शिक्षकेत्तर अनुदानासाठी महाराष्ट्र राज्य शासनाकडून ८३१ लाख संलग्नित महाविद्यालयांकडून संलग्निकरण शुल्क, संगणीकरण शुल्क, वार्षिक शुल्क, नवीन महाविद्यालयाकडील प्रथम शुल्क, नवीन अभ्यासक्रमाचे संलग्निकरण आदींच्या माध्यमातून १२७ लाख रूपये प्राप्त होणार आहेत. योग्यता प्रमाणपत्र, नोंदणी शुल्क, संशोधन पंजीयन शुल्क, स्थानांतरण शुल्क, टी. सी. ची दुय्यम प्रमाणपत्र, पदवी प्रमाणपत्र, इमिग्रेशन प्रमाणपत्र यांच्या माध्यमातून ११६ लाख रूपये परीक्षा शुल्काच्या माध्यमातून ६४९ लाख रूपये प्राप्त होणार आहेत. शैक्षणिक विभागातील मानव्य शास्त्र विभाग, विज्ञान विभाग, वाणिज्य विभाग, स्वयंरोजगार योजना विभाग, निरंतर प्रौढ शिक्षण विभाग आदींच्या माध्यमातून १६ लाख रूपये इमारत भाडे ८0 हजार, अग्रीम ३४0 लाख विद्यापीठ वार्षिक निधी १९७ लाख ७५ हजार, शिक्षक कल्याण निधी व शिक्षकेत्तर कल्याण निधीच्या माध्यमातून २ लाख २५ हजार रूपये महाराष्ट्र शासनाकडून ५00 लाख रूपये इमारतीचा निधी ३00 लाख, दान निधी ३0 लाख व सर्वसाधारण मुदत ठेवीतून ८00 लाख रूपये प्राप्त होणार आहेत. नवीन प्रशासकीय इमारत, वसतिगृह, परीक्षा भवन, ग्रंथालय बांधकाम यासाठी राज्य शासन, आदिवासी विकास विभाग विद्यापीठ अनुदान आयोगाकडून ९२.२३ कोटी ८१ हजार रूपये प्राप्त होणार आहेत. स्वतंत्र प्रकल्प योजनामधून १४ कोटी ७0 लाख, ६८ हजार रूपये प्राप्त होणार आहेत.शिक्षक व शिक्षकेत्तर अनुदानावर ८३१ लाख रूपये खर्च होणार आहेत. प्रशासकीय खर्चावर ४१८.९७ लाख, परीक्षा आयोजित करण्यासाठी ५२९.४0 लाख, पदव्युत्तर शैक्षणिक अभ्यासक्रम चालविण्यासाठी व स्वयंरोजगाराला भर देण्यासाठी १0 लाख २0 हजार, इमारत दुरूस्तीसाठी १५५ लाख कर्मचार्‍यांचा अग्रीमपोटी ३७१ लाख, पारीतोषिक, मेडल निर्मितीसाठी २ लाख ७५ हजार, शारीरिक शिक्षण विभागावर २७.३३ लाख, विद्यार्थी कल्याण परिषद १७.४८, विद्यापीठ ग्रंथालयासाठी ६.३१, संगणकावर ११.३६, वेतóोत्तर अनुदानावर ५00 लाख रूपये खर्च करण्यात येणार आहे.प्रशासकीय इमारत, वसतिगृह, परीक्षा भवन, शैक्षणिक विभाग, सांस्कृतिक भवन आदी निर्मितीसाठी ९२ कोटी २३ लाख ८१ हजार रूपये खर्च करण्यात येणार आहे. स्वतंत्र प्रकल्प योजनांवर १४ कोटी ७0 लाख ६८ हजार रूपये खर्च करण्यात येणार आहे.

■ दोन वर्षाच्या कालावधीत विद्यापीठाला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून केवळ १0 कोटी रूपयाचा निधी प्राप्त झाला आहे. विद्यापीठाला असलेला आवश्यक खर्च राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीतून करावा लागत आहे. सदर निधीसुद्धा वेळेवर उपलब्ध होत नाही. विद्यापीठाला शेकडो एकर जमीन आवश्यक आहे. अनुदान मिळण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आवश्यक असलेल्या अटी गोंडवाना विद्यापीठाने पूर्ण केल्या नाहीत. त्यामुळे विद्यापीठाला यूजीसीकडून मिळणार्‍या अनुदानापासून वंचित राहावे लागते. यूजीसीच्या अनुदान मिळावे यासाठी विद्यापीठ प्रयत्नरत आहे.