शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

१.३० लाखांचे सागवान जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 23:06 IST

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सिरोंचा वन परिक्षेत्राच्या अधिनस्त असलेल्या कारसपल्ली उपक्षेत्रातील निमलगुड्डम गावानजीकच्या जंगलात उपविभागीय वनाधिकारी व त्यांच्या सहकारी कर्मचाºयांनी धाड टाकून....

ठळक मुद्देनिमलगुड्डम जंगलात कारवाई : वनतस्कर पसार

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सिरोंचा वन परिक्षेत्राच्या अधिनस्त असलेल्या कारसपल्ली उपक्षेत्रातील निमलगुड्डम गावानजीकच्या जंगलात उपविभागीय वनाधिकारी व त्यांच्या सहकारी कर्मचाºयांनी धाड टाकून तब्बल १ लाख ३० हजार रूपये किमतीच्या २.६३० घनमीटरच्या सागवान पाट्या जप्त केल्या. सदर कारवाई ६ नोव्हेंबर रोजी सोमवारला करण्यात आली.निमगलगुड्डम गावानजीकच्या जंगलात सागवान माल दडवून ठेवल्याची गुप्त माहिती सिरोंचाचे उपविभागीय वनाधिकारी शंकर गाजलवार यांना मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सिरोंचा वन परिक्षेत्राचे वन कर्मचारी मर्रीगुडम-सिरकोंडा रस्त्याच्या बाजुने गस्त घालीत खंड क्रमांक १२ च्या जंगलात पोहोचले. यावेळी तेथे सागवान सिलपाट आढळून आले. वन कर्मचारी येत असल्याची चाहूल लागताच वन तस्कर घटनास्थळावरून पसार झाले. जवळपासच्या परिसरात पाहणी केली असता, एकूण पाच ठिकाणी सागवान माल दडवून ठेवल्याचे आढळून आले. घटनास्थळावर कोणीही इसम तसेच वाहन आढळून आले नाही. संपूर्ण सागवान पाट्या एकत्र करून मालाची मोजमाप केले असता, एकूण ३९ नग सागवान सिल पाट्या आढळून आल्या. १ हजार ३० रूपये किमतीच्या २.६३० घनमीटर एवढ्या सागवान पाट्या जप्त करण्यात आल्या. मोका पंचनामा व जप्ती नामा नोंदवून संपूर्ण माल सिरोंचा वन परिक्षेत्र कार्यालयात जमा करण्यात आला. सदर घटनेबाबत अज्ञात वन तस्करावर वन गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील चौकशी कारसपल्लीचे क्षेत्र सहायक एस. एस. येनगंटीवार करीत आहेत.सदर कारवाई सिरोंचाचे उपविभागीय वनाधिकारी शंकर गाजलवार, सिरोंचाचे वन परिक्षेत्राधिकारी जी. बी. दुर्गे, क्षेत्र सहायक एस. एस. येनगंटीवार, वनरक्षक ए. आर. बुध्दावार, वनरक्षक के. वाय. सहारे, पी. के. कोठारे यांच्यासह रोजंदारी वनमजुरांनी पार पाडली.