शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
13
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
14
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
15
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
16
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
17
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
18
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
19
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
20
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा

४० केंद्रावरून १३ हजार ३८१ विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा

By admin | Updated: February 13, 2015 01:42 IST

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी विभागीय शिक्षण मंडळ व जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाने कंबर कसली आहे.

गडचिरोली : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी विभागीय शिक्षण मंडळ व जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. बारावीच्या लेखी परीक्षेला २१ फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे. जिल्ह्यात ४० केंद्रावरून नियमित १२ हजार २७६ व १ हजार ५ पुनर्रपरीक्षार्थी असे मिळून एकूण १३ हजार ३८१ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. बारावीच्या परीक्षेसाठी विभागीय शिक्षण मंडळाच्या निर्देशानुसार जि. प. माध्यमिक शिक्षण विभागाने नियोजन केले असून परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे ओळखपत्रे कनिष्ठ महाविद्यालयात पाठविण्यात आली आहे. केंद्रप्रमुख आणि परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून येत्या १० तारखेपासून त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. गैरमार्गाविरूद्ध लढा कृती कार्यक्रमांतर्गत कॉपीमुक्त अभियान जिल्हाभरात राबविण्यात येत आहे. सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी पालकसभा आयोजित करून कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी पालकांमध्ये जनजागृती करावी, असे निर्देश दिले आहे. परीक्षा केंद्रावर गैरप्रकार करणाऱ्या संबंधित शिक्षक व कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करणार असून गैरप्रकाराबाबत कुणाचीही गय करणार नाही.-उल्हास नरड, शिक्षणाधिकारी (माध्य.) जि. प. गडचिरोलीसहा भरारी पथकांची राहणार नजरजिल्ह्यात बारावीची परीक्षा निकोप व शांततेच्या वातावरणात शिस्तीत पार पडावी, तसेच कापी प्रकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सहा भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये शिक्षणाधिकारी (माध्यमिक), शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (निरंतर), उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक), प्राचार्य डायट व एका स्वतंत्र महिला पथकाचा समावेश आहे.