देसाईगंज : पंतप्रधानांच्या आवाहनानंतर आरमोरी क्षेत्राचे आमदार क्रिष्णा गजबे यांनी शुक्रवारी देसाईगंज येथील समर्थ गॅस एजन्सीला प्रत्यक्ष भेट देऊन आपली गॅस सबसिडी सोडत असल्याबाबतचा अर्ज संचालक मनीष समर्थ यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, न.प. उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, नगरसेवक राजू जेठाणी, संतोष शामदासानी, सतपाल नागदेवे, शंकर कुकरेजा, नानक कुकरेजा, लक्ष्मण रामानी, प्रमोद चिलवे, मनोहर डांगे, सतराम मोटवानी, मनीष समर्थ आदींनी गॅस सबसीडी सोडून दिली. यावेळी ज्योतू तेलतुंबडे, मंगेश शिवमकर, गोवर्धन डंगरे, सुधीर घोडीले, विठ्ठल राऊत, हेमंत वाकडे, योगिता फटींग आदी उपस्थित होते.
आमदारासह १३ जणांनी सोडली गॅस सबसिडी
By admin | Updated: August 8, 2015 01:31 IST