शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

१३ गटांना दालमिल संच

By admin | Updated: April 4, 2016 04:57 IST

तूर, लाखोळी, हरभरा, मूग, उडीद आदी कडधान्यावर प्रक्रिया करण्यासाठी जि.प. कृषी विभागाच्या वतीने शेतकरी महिला गटांच्या

दिलीप दहेलकर ल्ल गडचिरोलीतूर, लाखोळी, हरभरा, मूग, उडीद आदी कडधान्यावर प्रक्रिया करण्यासाठी जि.प. कृषी विभागाच्या वतीने शेतकरी महिला गटांच्या उत्पन्नात वाढ करण्याकरिता ९० टक्के अनुदानावर दालमिल संच देण्याची योजना हाती घेण्यात आली. या योजनेसाठी आदिवासी विभागाच्या गडचिरोली प्रकल्प कार्यालयाने ३० मार्च २०१६ रोजी जि.प. च्या कृषी विभागाला ११ लाख ७० हजार रूपयांचा निधी अदा केला आहे. या निधीतून सहा तालुक्यातील १३ शेतकरी महिला गटांना दालमिल संच देण्यात येणार आहे. याबाबतची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी गेल्या दोन-तीन वर्षांपासून विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहे. जि.प.चे तत्कालीन कृषी अधिकारी विजय कोळेकर यांच्या पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्यात कृषी यांत्रिकीकरणाची प्रक्रिया यशस्वीरित्या राबविण्यात आली. या नंतर जिल्ह्यातील अनेक महिला व पुरूष शेतकरी गट यांत्रिकीकरणातून दरवर्षी शेतीचे उत्पन्न वाढवित आहेत. यांत्रिकीकरणाचा उपक्रम यशस्वी झाल्याने जि.प. कृषी विभागाने महिला शेतकरी गटांना दालमिल संच देण्याची योजना आखली. त्यानंतर पत्र पाठवून आदिवासी विकास विभागाला निधीची मागणी केली. जि.प. कृषी विभागाने तयार केलेल्या प्रस्तावात ११ तालुक्यातील २० शेतकरी महिला गटांना ९० टक्के अनुदानावर एकूण १८ लाख रूपयातून दालमिल संच देण्याचे नियोजन केले. यात १० टक्के रक्कमेचा हिस्सा संबंधित गटाने लोक सहभागातून अदा करण्याचे निश्चित करण्यात आले. या योजनेसाठी गडचिरोली आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडून निधी उपलब्ध झाल्यामुळे गडचिरोली, आरमोरी, कुरखेडा, कोरची, धानोरा व चामोर्शी या सहा तालुक्यातून शेतकरी गटांना दालमिल संच एप्रिल महिन्याच्या अखेरीस अदा करण्यात येणार आहे. या संदर्भात दालमिल संच खरेदीची कार्यवाही सुरू झाली आहे.प्रती गटावर एक लाखाचा खर्च४शेतकरी गटांना दालमिल संचामध्ये एकूण चार वस्तू देण्यात येणार आहे. यामध्ये दालमिल संच एक नग, स्पायरल सेपरेटर एक नग, धान्यकोठी १० नग, वजनकाटा व इतर साहित्यांचा समावेश आहे. दालमिल संच ७१ हजार रूपयांचे, १२ हजार रूपयातून स्पायरल सेपरेटर, १० हजार रूपयातून १० नग धान्यकोठी तसेच सात हजार रूपयांतून वजनकाटा व इतर साहित्य देण्यात येणार आहे. या सर्व साहित्यांची किमत एक लाख रूपये आहे. यात शेतकरी गटांना १० टक्के हिस्सा म्हणून अदा करावयाचे आहेत. तर ९० हजार रूपयांचे अनुदान प्रत्येक गटांना मिळणार आहे.दालमिल संच वाटपासाठी निवड केलेले शेतकरी गटतालुकाशेतकरी गटाचे नावगडचिरोलीराणी दुर्गावती महिला बचत गट धुंडेशिवणीजिजाबाई आदिवासी महिला बचत गट चुरचुराजयसेवा महिला बचत गट गिलगावआरमोरीसावित्री महिला बचत गट वडधाशुभलक्ष्मी महिला बचत गट कोजबीजीवनज्योती महिला बचत गट कुरंडीमालकुरखेडाजागृती महिला शेतकरी स्वयंसहाय्यता गट भटेगाव सोनपूरराणी दुगार्वती महिला बचत गट येंगलखेडाकोरचीजनसेवा पुरूष बचत गट ढोलडोंगरीधानोरानारमाता महिला बचत गट पांढरसडाचामोर्शीप्रगती महिला बचत गट मार्र्कंडादेवजयसेवा आदिवासी महिला स्वयंसहाय्यता समूह किष्टापूर टोलापूजा महिला बचत गट पावीमुरांडा