शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

१२८ रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 01:15 IST

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ग्रामीण रूग्णालय धानोराच्या वतीने १३ ते १६ डिसेंबरदरम्यान आरोग्य व दंतशिबिर आयोजित करण्यात आले असून या शिबिराचे उद्घाटन समाजसेवक देवाजी तोफा यांच्या हस्ते गुरूवारी झाले.

ठळक मुद्देधानोरात शिबिर : १ हजार २१ रुग्णांची नोंदणी, रक्तदात्यांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ग्रामीण रूग्णालय धानोराच्या वतीने १३ ते १६ डिसेंबरदरम्यान आरोग्य व दंतशिबिर आयोजित करण्यात आले असून या शिबिराचे उद्घाटन समाजसेवक देवाजी तोफा यांच्या हस्ते गुरूवारी झाले. सदर शिबिरात तपासणी व औषधोपचारासाठी एकूण १ हजार २१ रूग्णांनी नोंदणी केली.उद्घाटनीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. देवराव होळी होते. प्रमुख अतिथी म्हणून पं.स. सभापती अजमन राऊत, नगराध्यक्ष लिना साळवे, न.पं. आरोग्य सभापती वंदना उंदीरवाडे, तहसीलदार महेंद्र गणवीर, सीआरपीएफच्या ११३ बटालियनचे उपकमांडंट प्रमोद सिरसाट, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे, जिल्हा महिला व बाल रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपचंद सोयाम, डॉ. बागराज धुर्वे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र चौधरी, शशिकांत साळवे, साईनाथ साळवे, डॉ. संतोष खोब्रागडे, डॉ. सतिश गांगुर्डे, डॉ.मंजुषा लेपसे, डॉ.सीमा गेडाम आदी उपस्थित होते.४३ वेळा रक्तदान करणारे प्रदीप श्रीपदवार, ४५ वेळा रक्तदान करणारे गजानन परचाके व ३३ वेळा रक्तदान करणारे अरूण कोवे यांचा सदर शिबिरात शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या शिबिरात ६७ रूग्णांची दंत तपासणी करण्यात आली. ५८ लोकांना क्ष-किरण सेवेचा लाभ देण्यात आला. २९७ नेत्र रूग्णांची तपासणी करण्यात आली व यापैकी ६५ रूग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. नेत्र वगळता इतर आजारग्रस्त ६३ रूग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन गौरी साळवे, प्रास्ताविक वैद्यकीय अधीक्षक डॉ. देवेंद्र सावसाकडे यांनी केले तर आभार गिरीष लेनगुरे यांनी मानले.सहा महिन्यांत उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा मिळणार -डॉ. होळीसुदृढ भारत निर्माण करण्यासाठी सर्वांचे आरोग्य निकोप व निरोगी असणे आवश्यक आहे. यासाठी सर्वांकडून प्रयत्न झाले पाहिजे. येत्या सहा महिन्यात धानोरा येथील ग्रामीण रूग्णालयाला उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा मिळणार असून धानोरा तालुक्यातील मुरूमगाव, पेंढरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना ग्रामीण रूग्णालयाचा दर्जा मिळणार आहे. याबाबतचे प्रयत्न सुरू झाले आहे, अशी माहिती आमदार डॉ. देवराव होळी यांनी अध्यक्षीय भाषणातून दिली. आयुष्यमान योजनेचा सर्व नागरिकांनी लाभ घेतला पाहिजे. आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तळागाळातील रूग्णांना आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन डॉ. होळी यांनी यावेळी केले.