शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

१२ माओवाद्यांनी शस्त्र टाकले, मुख्यमंत्र्यांनी हाती संविधान सोपविले

By संजय तिपाले | Updated: June 6, 2025 20:16 IST

एक कोटीहून अधिक रुपयांची होती बक्षीसे : दोन महिला माओवाद्यांची गणवेशात शरणागती

संजय तिपालेगडचिरोली : माओवादी चळवळीतील अनेक हिंसक कारवायांमध्ये सक्रिय असलेल्या १२ माओवाद्यांनी ६ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. यावेळी दोन सशस्त्र महिला माओवाद्यांनी गणवेशात मुख्यमंत्र्यांसमोर एंट्री केली. नम्रपणे शस्त्रे बहाल केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांचे कौतुक करत हाती संविधान सोपविले. अशा प्रकारे आत्मसर्पण केल्याची ही पहिलीच घटना आहे.

पोलिस मुख्यालयावरील सभागृहात हा सोहळा झाला. आत्समर्पण केलेल्या १२ माओवाद्यांवर एक कोटीहून अधिक रुपयांची बक्षीसे होती. डीव्हीसीएम सपनाक्का (दंडकारण्य स्पेशल स्पेशन झोनल कमिटी सदस्य गीरेड्डी पवनानंद रेड्डी याची पत्नी) सह डीव्हीसीएम दर्जाचे चार वरिष्ठ कॅडर, एक कमांडर, दोन उप-कमांडर, चार एरिया कमिटी मेंबर व एक सदस्य यांचा यात समावेश आहे.

सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ मिलिंद नरोटे, वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव व जिल्ह्याचे पालक सचिव मिलिंद म्हैसकर, पोलिस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल आदी उपस्थित होते. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी माओवादविरुध्दच्या कारवायांसोबतच कम्युनिटी पोलिसिंगबद्दल तपशीलवार माहिती दिली.

जवानाच्या तोंडून ऐकला थरारक प्रसंगयावेळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विविध माओवादी चळवळीत निडरपणे योगदान देणाऱ्या अधिकारी व सी- ६० जवानांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. कवंडे (ता. भामरागड) येथे भरपावसात छत्तीसगड सीमेलगतच्या इंद्रावदी नदीकाठी जवानांनी नक्षलविरोधी अभियान राबविले होते. चकमकीत चार माओवाद्यांचा खात्मा केला होता. या अभियानाचा थरारक प्रसंग सी- ६० चे सहायक उपनिरीक्षक महादेव मडावी यांनी मुख्यमंत्र्यांपुढे उलगडला. जवानांनी कठीण परिस्थितीत राबविलेल्या मोहिमेची कथा ऐकून मुख्यमंत्री क्षणभर चकित झाले, आपल्या भाषणात त्यांनी आज कवंडे येथे भेट दिली असता माओवादी ज्या बेटावर लपून बसले होते, त्याची पाहणी केली. डोक्याएवढ्या पाण्यातून वाट काढत जवानांनी राबविलेले हे अभियान अभिमानास्पद असल्याचे सांगून त्यांनी दाद दिली.

गिरेड्डी पवनानंदची पत्नी सपनाक्काचा समावेशआत्मसमर्पण केलेल्या १२ माओवाद्यांवर एक कोटीहून अधिक रुपयांची बक्षीसे होती. डीव्हीसीएम सपनाक्का (दंडकारण्य स्पेशल स्पेशन झोनल कमिटी सदस्य गिरेड्डी पवनानंद रेड्डी याची पत्नी) सह डीव्हीसीएम दर्जाचे चार वरिष्ठ कॅडर, एक कमांडर, दोन उप-कमांडर, चार एरिया कमिटी मेंबर व एक सदस्य यांचा यात समावेश आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीnaxaliteनक्षलवादी